संस्कृत भारती पुणे ग्रामीणचे जनपद संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न




मावळ मराठा न्युज:- तळेगाव,संस्कृत भारती पुणे ग्रामीण जनपद यांनी आयोजित केलेले जनपद संमेलन नुकतेच ‘ योगीराज हॉल तळेगांव ‘ येथे संपन्न झाले. या संमेलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. संमेलनाचा आरंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन, भारत माता आणि प्रभू रामचंद्रच्या पवित्र प्रसन्न प्रतिमा पूजनाने झाला. यावेळी , मदन गोपाल वार्ष्णेय,न्यासी , संस्कृत भारती, दत्तात्रेय वज्रहळ्ळि,अखिल भारतीय पदाधिकारी ,संस्कृत भारती, मोरेश्वर देवधर , डॉ शाळीग्राम भंडारी , वैद्य सौ ज्योती मुंदर्गी इ मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी श्री वरद लेले यांनी केलेल्या शंखध्वनीने वातावरण पावन झाले. संस्कृत भारती पुणे ग्रामीण च्या वतीने सौ मंजूषा तेलंग यांनी सर्वांचे स्वागत केले. महर्षी वेदव्यास वेदपाठ शाळा , आळंदी येथील विद्यार्थ्यांनी वेद मंत्रांचे पठन केले.त्यांचे शिक्षक आचार्य विवेक या प्रसंगी उपस्थित होते. संस्कृत भारताची उद्दिष्टे , कार्यपद्धती स्पष्ट करणारे प्रास्ताविक मोरेश्वर देवधर यांनी केले. प्रमुख पाहुणे नवोन्मेष शाळेचे प्रा अरगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्घाटनाकरिता प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या प्रख्यात गायक व पत्रकार सुरेश साखवळकर यांनी मनोगत व्यक्त केले. जगात साधारणपणे ४०,००० भाषा बोलल्या जातात. त्यातल्या २००० भाषा भारतात तर महाराष्ट्रात ६०० भाषा प्रचलित आहेत. किमान आम्हा महाराष्ट्रीय लोकांना तरी संस्कृत भाषा बोलता आली पाहिजे , कारण या सर्व ६०० भाषांना संस्कृत खूप सोपी आहे असे मत व्यक्त केले . तिला पुनर्वैभव प्राप्त व्हावे यासाठी संस्कृत भारती अखंड कार्यरत आहे , त्यात मोठ्याप्रमाणात जनसामान्याने सहभागी व्हायला हवे आहे. अशा कार्यक्रमांची रचना त्याच साठी आहे. या नंतर आशीर्वचन देण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रख्यात वैद्य सौ. मुंदर्गी यांनी मनोगतात, आयुर्वेदाचा तर आत्माच संस्कृत आहे. संस्कृत ही ज्ञानाची तितकीच विज्ञानाची भाषा आहे. भारतातल्या ९७% भाषा संस्कृत मधूनच उगम पावल्या गेलेल्या आहेत. आपल्या पेक्षा जास्त , पाश्चात्यांनी आता संस्कृत भाषेचे महत्व ओळखले आहे. जर्मनीमध्ये १४ विद्यापीठात संस्कृत भाषा शिकवली जाते. अत्यंत प्रगत झालेले असे आपले स्थापत्य शास्त्र , खगोल , रसायन , भौतिक , गणित , भूमिती , अभियांत्रिकी ही सर्व शास्त्रे आपल्या कडे , संस्कृत मधूनच अतिशय प्रगत झाली. संगणकाकरिता देखिल हीच भाषा अतिशय उपयुक्त आहे हे इतक्यातच डॉ विजय भटकारांनी सिद्ध केलेलं आहे. या भाषेचे रक्षण , संवर्धन आणि पुनरुथान होणे हे अतिशय गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या.डॉक्टर भंडारी हे संस्कृत संमेलनाकरिता पालक अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जगात तीन प्रकारची माणसं असतात भोगी, योगी,त्यागी त्यातील संस्कृत भारतीचे हे सर्व कार्यकर्ते योगी आणि त्यागी आहेत. संस्कृत भाषा ,त्यातली सुंदर सुभाषिते ही जीवन कसं सुंदरतेने , प्रसन्नतेने जगावं हे सांगतात. संस्कृत भारती चे अभिलेखागार प्रमुख दत्तात्रय वज्रहळ्ळि यांनी आपल्या भाषणात संस्कृतमुळे संस्कृतीचे रक्षण होते.भारतभूमी चे मूळ संस्कृतात आहे. लोककल्याणा करिता संस्कृत भाषा अत्यंत महत्वाची आहे. कुटुंबरक्षण, समाजरक्षण, राष्ट्रंरक्षण संस्कृत मुळे शक्य आहे असे प्रतिपादन केले. या भाषणानंतर गटशः चर्चा झाली. चर्चेच्या शेवटी प्रत्येक गटप्रमुखांच्या द्वारे सर्वांनी भविष्यकाळात आपण हे संस्कृत भारतीचे कार्य सक्षमपणे पुढे नेऊ असा संकल्प केला. प्रख्यात गायिका संपदा थिटे यांच्या शिष्यांनी स्तोत्र मंजिरी नावाचा कार्यक्रम संस्कृतातून सादर केला. त्यानंतर तळेगावच्या स्वरगंधा भजनी मंडळ यांनी सुंदर भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर केला. कन्या शाळा चाकण येथील विद्यालयातील मुलींनी स्वामी विवेकानन्द यांच्या जीवनावरिल संस्कृत गीत सादर केले. या वेळी संजीव कुमारः क्षेत्रिय संघटन मंत्री हे उपस्थित होते. मदनगोपाल वार्ष्णेय,गुजरात यांनी केले. आणि आनंद तेलंग यांनी गायलेल्या संपूर्ण वंदेमातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद भिसे आणि अमेय जोशी यानी केल. आभार प्रदर्शन डॉ चंद्रकांत देशमुख यांनी केले. ज्या योगीराज हॉल मध्ये हा दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला यासाठी श्री आशीष पाठक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाकरिता विशेष परिश्रम सौ. वसुधा ताई साठे, जोती ताई मुंगी, सोनल जोशी मंजूषा तेलंग यांनी केले . तसेच सौ रुचिता जोशी निकिता बोरकर शीतल सुरलकर यांनी करिता परिश्रम घेतले सदानंद भिसे, अमेय जोशी, आनंद तेलंग ह्यांचा ह्या कार्यक्रमांची हातभार लागला. आदित्य करंदीकर आणि शशी शेण्ड्ये ह्यांनी पुस्तक विक्रीकरिता मदत केली. या सर्वर्थाने यशस्वी झालेल्या एकदिवशीय संस्कृत संमेलनासाठी ज्यांच मोलाचं आर्थिक सहाय्य लाभलं त्यात चंद्रकला हरिनारायणजी भुतडाश्रीमती विशाखा टुमणे,रामदासजी काकडे,संतोश खांडगे,किरण ब्रिजेद्र किल्लेवाला,सुनंदा प्रकाश जोशी,मनोजजी ढमालेविलासजी काळोखे,चंद्रकांतजी थिटे,जयश्री जोशी,प्रभा देशपांडे, मोहनजी कुंटे याचे मनापासून आभार मानण्यात आले.




