शिवासेवा प्रतिष्ठानचा तिसरा वर्धापन दिन संस्कृती जपत लोणावळ्यात साजरा








मावळ मराठा न्युज-लोणावळा,संस्कार वर्ग त्यागाची सेवेची निष्ठेची एक तपस्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे देखिल लक्ष द्यायला वेळ पुरत नाही तर आपली संस्कृती, त्याचा इतिहास, विविध श्लोक हे सगळं शिकवणं तर फार दूरची गोष्ट.हिच शोकांतिका लक्षात घेऊन लोणावळ्यात शिवसेवा प्रतिष्ठान ने लहान मुलांसाठी संस्कार वर्ग चालविण्याचा निर्णय घेतला.साधारणतः तीन वर्षांपूर्वी १२ जानेवारी रोजी, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोणावळ्यात शिवसेवा प्रतिष्ठानने आपला सुरुवातीचा पहीला वर्ग एक नंबर शाळेत सुरू केला. श्रीमती ऋतुजा मेहता आणि सौ विनिता खळदकर यांनी हा संस्कार वर्गाला प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली.दोघींनी अत्यंत चिकाटीने मुलांना शिकवल..विशेष म्हणजे सगळी मुलं इतकी छान तयार झाली.. गीतेचे अध्याय/ गणपती अथर्वशीर्ष /संध्याकाळी म्हटले जाणारे सगळे श्लोक/ छान, छान गाणी/ चांगले खेळ/ योगा काय येत नाही मुलांना आता सांगा..? संपूर्ण वंदे मातरम सुद्धा मुलांनी पाठ केलय….!!आता त्या मुलांच्या पालकांना त्यांच्या त्या छोट्या छोट्या मुलांवर गर्व वाटतोच आहे पण या शिक्षकांवर सुद्धा गर्व वाटतोय… एवढेच पुरेसं नाही गणपतीच्या दिवसांमध्ये सगळ्या मुलांना घेऊन गणपती मंडळांच्या समोर गणपती अथर्वशीर्ष म्हणायला जाणं आणि छोट्या छोट्या कित्येक ऍक्टिव्हिटी खरंच …या दोन्ही शिक्षकांचं आणि त्या सर्व मुलांचं सगळ्यांचं कौतुक आहे.लोकाग्रहास्तव दुसराही संस्कार वर्ग भांगरवाडी येथे सुरू करण्यात आला आणि आता लोणावळ्यातील प्रत्येक विभागातून संस्कार वर्ग सुरू करण्याबाबत मागणी होत आहे.अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेने देखिल लोणावळ्यातील या संस्कार वर्गातील मुलांच्या संस्कारांची दखल घेत त्यांना मानपत्र देऊन कौतुक केले आहे.शिवसेवा प्रतिष्ठान लोणावळा यांच्या तिसरा वर्धापन निमित्त येथील शाळा क्रमांक १ मध्ये महाराष्ट्राच्या कला, संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळाले.शिवसेवा प्रतिष्ठान चा पहिल्या संस्कार वर्गाचा तिसरा वर्धापन दिवस नगरपरिषद शाळा क्र. १ येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्कार वर्ग चालविणाऱ्या सर्व शिक्षिका तसेच शिवसेवा प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला तसेच पालक वर्गाने ही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.अगदी वासूदेव परंपरा ते भारुड इ. सर्व पारंपरिक व सांस्कृतिक सादरीकरण विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या केले.याप्रसंगी बापूसाहेब भोंडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. माधवी थत्ते या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.



