एकोले गावातील लोटस पाँईटला तरुणाचा बुडून मृत्यू,शिवदुर्ग मित्र,वन्यजीव रक्षक,मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती व स्थानिक गावकरीच्या मदतीने शोधला मृतदेह







मावळ मराठा न्यूज – आयुष हरिणखेडे वय वर्ष २१ सध्या राहणार कात्रज, मुळ गाव गोंदीया पाच मित्रांबरोबर एकोले येथे फिरायला आला होता. पोहता नीट येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
दुपारी १२ .३० वाजता रेस्कु टीमला फोन आला ४ .०० वाजता सर्व टिम घटनास्थळी पोचल्या व शोधकार्य चालु झाले ५ .३० वाजता मृतदेह सापडला परंतु अवघड वाटेतून मृतदेह उचलून आणने सोपे नव्हते सर्व आव्हाने पार करीत रात्री ९ .०० वाजता मृतदेह पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला. सदरच्या मोहिमेत उमेश कुंभार,आकाश मोरे,कुणाल कडू, महेश मसने, सागर कुंभार,अनिकेत घरदाळें,अजय मयेकर,गणेश भांगरे, वैष्णवी भांगरे, कपिल दळवी,आनंद गावडे, निलेश गराडे, अनिल आंद्रे, गणेश गायकवाड,रवी कोळी,नागेश मोरे, विश्वनाथ दिघे, नवनाथ कडू,संदीप दिघे, अभिमन्यू सुतार,अनंता दिघे,रोशन ओव्हाळ,महेश पवार { पौड पोलीस },हिरामण कुंभार,
मंगेश मोरे,किशोर दिघे,प्रमोद बलकवडे,शार्दुल बलकवडे,नागेश मंजुळे, वैभव नाईकवाडे,नितीन धुमाळ,सुनिल गायकवाड या टीमने सहभाग घेतला.



