स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे या मागणीसाठी १२ जानेवारीला धरणे आंदोलन-सूर्यकांत वाघमारे

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभिकरण नगर पालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहेत. त्यात विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, विश्वभूषण भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीवीर महात्मा ज्योतीबा फुले, राष्ट्रसंत गाडगे महाराज, साहीत्य रत्न डॉ आण्णा भाऊ साठे या महापुरुषांच्या स्मारकाचा सहभाग आहे परंतु स्वातंत्र्य वीर वि.दा. सावरकर यांचे स्मारक दुर्लक्षित आहे या स्मारकाचे सुशोभिकरण अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात यावे या मागणी साठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने १२ जानेवारी रोजी १ दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अश्या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी पुणे, नगराध्यक्ष, लोणावळा नगर परिषद, मुख्याधिकारी लोणावळा नगर परिषद यांना देण्यात येणार आहे. लोणावळा शहरातील भांगरवाडी येथिल मध्यवर्ती या ठिकाणी आहे या स्मारकाचे यथोचित सुशोभिकरण झाले पाहिजे या मागणी साठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.तरी या आंदोलनात सावरकर प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश सचिव आरपीआय (आठवले ) मा. नगराध्यक्ष लोणावळा नगर परिषद मा सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती मा सभापती लोणावळा नगर परिषद शिक्षण मंडळ,सूर्यकांत वाघमारे यांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page