कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कोथुर्णे, मावळ येथे भव्य ग्रंथ दिंडीचे आयोजन








मावळ मराठा न्युज लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट्च्या डॉक्टर बी. एन. पुरंदरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लोणावळा येथील मराठी विभाग व ग्रंथालय विभागाच्या वतीने कोथुर्णे या ठिकाणी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी भव्य ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. या पंधरवड्या निमित्त या गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ग्रंथ भेट देण्यात आले. या ग्रंथदिंडीचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री प्रवीण पारगावकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सुरेश दळवी, मराठी विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र देवरे, उपप्राचार्य विलास पाटील प्रा. डॉ. संदीप पोकळे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथदिंडीत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्राध्यापक, प्राध्यापके तर कर्मचारी यांनी पारंपारिक वेशात टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये मराठी भाषेचा गजर करत सहभाग घेऊन गावात ग्रंथदिंडी काढली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लोणावळा महाविद्यालयातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते यात ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, व्याख्याने तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते असे ग्रंथदिंडीच्या प्रास्ताविकामध्ये डॉ. राजेंद्र देवरे यांनी सांगितले. ग्रंथ दिंडी संपन्न झाल्यानंतर मा, प्रवीण पारगावकर यांचे मन भावना व वर्तन यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झालेया कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र देशमुख यांनी मराठी भाषा आजही ग्रामीण भागामध्ये टिकून आहे. समाज माध्यमांच्या प्रभावामुळे वाचनाची आवड कमी होत असल्याने शाळेतील मुलांना वाचनीय पुस्तके भेट देण्याचा उपक्रम महाविद्यालयाने केला आहे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. पवन शिनगारे, प्रा. धनराज पाटील, प्रा. भूषण गोंदके, प्रा. रोहित राणे, प्रा. अमोल नवगिरे,, सरपंच सौ. जुईली दळवी, उपसरपंच, श्री शांताराम कुंभार, श्री राजाभाऊ कुंभार, श्री. रामभाऊ नढे, श्री सुनील पाठारे, मुख्याध्यापक संजय ओव्हाळ, मुख्याध्यापिका कविता दंडवणे यांनी विशेष सहकार्य केले. महाविद्यालयातील. डॉ. अमर काटकर, डॉ. संदीप सोनटक्के, डॉ. नितीन बोडके डॉ. मल्हारी नागतिलक, डॉ. सुपर्णा मित्रा, प्रा. भारती राजे भोसले, प्रा. ज्ञानदेव रणशूर,, प्रा. संजय साळुंखे, डॉ. धनश्री पाध्ये, प्रा. भक्ती अहिर. प्रा. रोहन वर्तक, ग्रंथालय प्रमुख चांगुणा ठाकर, प्रा. गणेश आखाडे, प्रा. समीर गायकवाड, प्रा. धन श्रीगाढे. प्रा. तन्ही, कार्यालयीन कर्मचारी पोर्णिमा गायकवाड, सुरेखा राणे-जंगले, रवींद्र उंबरे आदी कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धनराज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पराग कुलकर्णी आभार प्रा. संतोष शिंदे यांनी मानले.



