माझी वसुंधरा ३ .० स्‍पर्धेत लोणावळा नगर परिषदेने पटकावला महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आणि साडे पाच कोटींचे बक्षीस

मावळ मराठा न्यूज:-मुंबई,महाराष्‍ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरण विभागामार्फत आयोजीत माझी वसुंधरा ३ .० स्‍पर्धेत ५० ते १ लाख लोकसंख्या असलेल्या गटात संपूर्ण राज्‍यात लोणावळा शहराने दुसरा क्रमांक पटकावून ४ कोटीचे बक्षीस प्राप्‍त केले तसेच संपूर्ण राज्‍यात भुमी या तत्‍वात सर्वप्रथम येत रु.१ .५० कोटींचे चे पारितोषीक असे एकूण ५ .५ कोटीचे पारितोषिक पटकावून दुहेरी मुकूट परिधान केलेला आहे. या बक्षिस वितरण समारंभाचे वेळी महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्‍यक्ष राहूल नॉर्वेकर तसेच राधाकृष्‍ण विखे पाटील व पर्यावरण व वातावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांचे शुभहस्‍ते हा पुरस्‍कार लोणावळा नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी पंडीत पाटील माजी नगराध्यक्षा श्रीमती सुरेखाताई जाधव, माज़ी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , व अधिकारी कर्मचारी यांनी स्‍वीकारला. या दुहेरी यशाबद्दल व सलग दुस-या वर्षीही सातत्‍य राखलेबद्दल संपूर्ण शहरातून अभिनंदनाचा वर्षाव लोणावळा नगरपरिषदेवर होत आहे. मावळ मराठा न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page