जेष्ठ नागरिकांच्या सूर साधना परिवाराच्या “छायागीत ” कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद


मावळ मराठा न्युज :-लोणावळा येथील महिला मंडळ हॉल मध्ये जेष्ठ नागरिकांच्या गाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी महिला प्रेक्षकांनी आवर्जून हजेरी लावली होतीसूर साधना क्लास चे संचालक प्रदीप वाडेकर यांनी जेष्ठ कलाकारांसाठी जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता सर्व सूर साधना गायन क्लासेस च्या जेष्ठ कलाकारांनी १९६० ते १९८० पर्यंत चित्रपटातील गाणी सादर केली अतिशय सुंदर सादरीकरनामुळे रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले गायक पांडुरंग तिखे, पुरषोतम पाटील, सुनील पाणगावकर, प्रकाश कालेकर, गोरख चौधरी, ज्योती रांगणे, शारदा अगरवाल, प्रतीक्षा महाडिक, शांता दिसले,उषा बोरासकर, सुलभा लांबट, नंदिनी पराळे, रश्मी सिरस्कर, शोभा मांढरे, शारदा भांबुरे,यांनी गिते सादर केली कार्यक्रमाला आधार फाउंडेशन चे अध्यक्ष प्रकाश पाठारे, राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षा उमा मेहता, भाजपच्या माजी महिला आघाडी अध्यक्षा योगिता कोकरे, पारिजा भिलारे, पार्वती रावलं, जेष्ठ पत्रकार सी बी जोशी, श्रीराम कुमठेकर, राजेश मेहता, शत्रूघन खंडेलवाल,माजी नगरसेविका कांचन लुनावत, दत्ता लाड, हनुमंत साबळे, श्रिया रहाळकर, किरण स्वामी, प्रमोद बन्सल, शिला जोशी मंगल राणे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्तिथ रसिक प्रेक्षकांचे स्वागत जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, मृदुला पाटील, व संध्या गव्हाले यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी सिरस्कर व प्रदीप वाडेकर यांनी केले




