*महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्ह्यतर्फे जिल्हास्तरीय सामूहिक १०८ सूर्यनमस्कार शिबीर यशस्वी संपन्न!*








मावळ मराठा न्युज -प्रतिनिधी संतोष खरटमोल,मुंबई,रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी, महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ मनोज निलपवार सर आणि कार्याध्यक्ष प्रसाद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्हा आणि व्हीनस कल्चर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्राती व रथसप्तमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सामूहिक १०८ सूर्यनमस्कार शिबिरामध्ये १८० हून अधिक योगप्रेमी सहभागी झाले होते. ह्या कार्यक्रमामध्ये गोरेगाव विभागातील भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर जी, विख्यात कामगार नेते व धडक कामगार युनियनचे संस्थापक, महासचिव अभिजितदादा राणे जी, डायरेक्टर योगिक गुरुकुल व शिव हॉलिस्टिक योगचे प्रमुख रवि दीक्षित जी, सिने व नाट्य अभिनेते मिलिंद पाठक जी तसेच मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरुज भोईर, आदर्श शिक्षिका मनीषा मांढरे, समाज सेविका शशी सिंघनिया, किरण सिंघनिया असे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्ह्याच्या ह्या तिसऱ्या वर्षाच्या उपक्रमामध्ये योगसाधकांचा भरभरून प्रतिसाद लाभला व सर्व योगसाधकांनी १०८ सूर्यनमस्कार झाल्यानंतर जल्लोषात आनंद साजरा केला.या सर्व नियोजनात मुंबई जिल्ह्याचे महासचिव कृष्णकुमार शिंदे, कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर, मीडिया प्रभारी अमित चिबडे, उपाध्यक्षा मनुजा चव्हाण, सचिव हिरा गणवीर, महिला प्रकोष्ट प्रभारी डॉ. पौर्णिमा काळे, सदस्य साक्षी कलगुटकर, प्रियांका ढोले, दिलीप घाडगे, प्रभा शेट्टी, रेश्मा धुरी पाटील, अर्निका बांदेलकर, शालिनी भंडारी, भारती कवनकर, कांचन राणे, प्रसाद काठे, केशर कूलाबकर, भारती कावनकर, वैशाली कराड, अर्निका बांदेलकर, वर्षा शर्मा, जयदीप कनकिया, राखी सोनवणे, सोनल पिंगळे, सोनाली चव्हाण, रीना दत्ता, भारती जगताप, अनिल चव्हाण, अमोल देवघरकर यांच्या सर्वांच्या मेहनतीने व उपस्थित साधकांमुळे आणि उपस्थित प्रमुख पाहुण्यांमुळे हे उपक्रम यशस्वी संपन्न झाल्यामुळे मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री संतोष खरटमोल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.



