*संपर्क संस्थेच्या विविध प्रकल्पांसाठी बऊर इक्विपमेंट इंडिया कंपनीचा मदतीचा हात*




मावळ मराठा न्युज – भाजे-मावळ,संपर्क भाजे मलवली येथील संपर्क संस्थेच्या विविध प्रकल्पांना बऊर इक्विपमेंट इंडिया कंपनीच्या वतीने ,सी एस आर फंडातून भरीव सहकार्य व मदत करण्यात आली,. यात संस्थेच्या लिली इंग्लिश मिडीयम स्कूलच्या कनिष्ठ महाविद्यालय शास्त्र शाखे करिता प्रयोगशाळा साहित्य, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, तसेच संपर्काच्या भाजे बालग्राम येथील मुलींच्या वसतिगृह शारदा सदन व आशियाना सदन चे नूतनीकरण करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिमेश नंदी संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, विश्वस्त रत्ना बॅनर्जी, कंपनीचे, वरिष्ठ प्रकल्प सल्लागार नवनीता चटर्जी,रेंटल व प्रोडक्शन सव्यवस्थापक राजेंद्रसिंह राठोड, मनुष्यबळ विभाग प्रमुख सुहासिनी दास, वरिष्ठ व्यवस्थापक सेवा निर्मल दिनकर, वरिष्ठ व्यवस्थापक रेंटल जसपाल सिंग, विक्री व्यवस्थापक योगेश तिडके, लेखा अधिकारी अनिरुद्ध वाघमारे , मनुष्यबळ व्यवस्थापक अमोल साखरे ,उपव्यवस्थापक विपुल गाडी , संपर्क संस्थेच्या वरिष्ठ प्रकल्प सल्लागार , उपस्थित होते,. अनिमेश नंदी बोलताना म्हणाले , विद्यार्थी वर्गाने एकाग्रतेने अभ्यास करावा.तसेच नवनवीन तंत्रज्ञाने शिकावे असे आवाहन केले. संपर्क संस्थेला केलेली ही मदत व सहकार्य ही केवळ सुरुवात असून भविष्यात मोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रदीप वाडेकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी संपर्क चे सतीश माळी, चेतन देशमुख, योगेंद्र कुलकर्णी, विंद्या बापट, शुभंकर शाह,सुभाष बोगार्डे, समाधान मोहोर यांनी विशेष परिश्रम घेतले आभार नवनिता चटर्जी यांनी मानले.




