लोणावळ्यात व्हिपीएस शाळेत १२ वी च्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देवून दिल्या शुभेच्छा







मावळ मराठा न्युज -लोणावळा,व्ही.पी. एस.हायस्कूल व द.पु मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेसाठी मुख्य केंद्रावर १३५३ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळा समिती अध्यक्ष श्री भगवान भाऊ आंबेकर, प्रशालेचे प्राचार्य श्री. विसाळ सर, उपमुख्याध्यापक श्री रसाळ सर , पर्यवेक्षक श्री गजेंद्रगडकर, पर्यवेक्षक श्री खामकर सर, पर्यवेक्षिका श्रीमती पाध्ये मॅडम प्रशालेचे उपप्राचार्य व केंद्र संचालक श्री आदिनाथ दहिफळे सर उपकेंद्र संचालक श्री. कल्याण चौगुले सर, श्री बाळू पिंगट सर प्रशालेचे मुख्य लिपिक श्री कुंडलिक आंबेकर सर, श्री देशमुख सर, सर्व शिक्षक वर्ग यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करून भयमुक्त वातावरण निर्मिती केली. परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना माईक वरून सर्व मार्गदर्शन व सूचना प्रशालेतील श्री सचिन लांडगे सर यांनी केले. या सर्व परीक्षा सी.सी.टी.व्ही कॅमेरे अंतर्गत होत आहे.परीक्षा केंद्रावर बोर्डाने नेमलेले बैठक आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विद्याप्रसारणी सभेचे नियामक मंडळ अध्यक्षा.मा. डॉ. मॄणालिनी गरवारे मॅडम, कार्यवाह मा.डाॅ.सतीशजी गवळी सर, सहकार्यवाह विजयजी भुरके सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.



