राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर मंथन; मावळ तालुका पत्रकार संघाला मुख्यविश्वस्त एस एम देशमुख यांचं मार्गदर्शन आणि सूचना







मावळ मराठा न्युज -वडगाव मावळ,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न मावळ तालुका पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयास अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व विश्वस्त शरद पाबळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संघाच्या पदाधिकारी व सदस्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत पत्रकारांच्या विविध प्रश्नांसह संघटनेच्या आगामी वाटचालीवर सविस्तर चर्चा केली.पत्रकारिता क्षेत्रासमोरील बदलती आव्हाने, पत्रकारांच्या अडचणी, संघटनात्मक बांधणी तसेच पत्रकारांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत यावेळी विचारविनिमय झाला. संघटनेने पत्रकारांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देत एकजुटीने काम करण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली.या वेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मावळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ठाकर, ज्येष्ठ पत्रकार अमिन खान,ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा,अॅड संजय पाटील,रेखा भेगडे, प्रा. महादेव वाघमारे, दत्तात्रय म्हाळसकर, प्रा. ऋषिकेश लोंढे, मयूर सातपुते, सुभाष भांडे, अनिस शेख, विद्या अडसूळ, सुनील म्हस्के, पूनम निकम, संतोष थिटे,पूनम निकम,शकील बागवान,प्रफुल सोनावणे,मनोज मोरे आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.मावळ तालुका पत्रकार संघांचे योगेश घोडके यांनी वर्षभर होणाऱ्या प्रकल्पची माहिती दिली.मान्यवरांच्या या भेटीमुळे मावळ तालुका पत्रकार संघाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि स्थानिक पातळीवरील पत्रकारिता अधिक सक्षम करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पुढील काळात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.



