अनाम-प्रेम परिवार,सुमती ग्राम ह्यूमन राईटस् प्रोटेक्शन फोरमने तीन दिवसीय राष्ट्रीय बौध्दिक विकलांग परिषदेत मुला मुलींनी लुटला मनमुराद आनंद




मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,येथील सुमंत पॅलेस येथे अनाम-प्रेम परिवार आणि सुमती ग्राम ह्यूमन राईटस् प्रोटेक्शन फोरमतर्फे २४ ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान लोणावळा येथे आयोजित ‘साद-प्रतिसाद’ २०२३ या बालमेळाव्यात छत्तीसगड, महाराष्ट्र,गोवा, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या सहा राज्यातील बौद्धिकदृष्ट्या विकलांगांसाठी असलेल्या विशेष शाळांमधील दीडशेहून अधिक मुलामुलींनी सहभाग घेतला. एकाग्रता, उत्सुकता आणि निरागसता अशा मुलामुलींमध्ये सामान्यांपेक्षा जास्त असल्याने त्यांच्यातील कार्यकुशलतेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.लोणावळ्याच्या टाटा पॉवर बॉटनिकल गार्डनला या मुलांनी भेट देवून निसर्गाचा आनंद लुटला. दुस-या दिवशी स्मरणशक्ती स्पर्धा, दुकानदारी व्यवहार स्पर्धा, निरीक्षण अनुभव कथन स्पर्धा घेण्यात आल्या. आयत्या वेळेस विषय देवून त्यांच्यातील कलागुणांची केलेली पारख समाधानकारक असल्याचे मुख्य संयोजक तन्वी ठाकूर यांनी सांगितले. ‘कलाविष्कार’ कार्यक्रमात बालकलाकारांनी नृत्य, संगीत, नाटिकांच्या केलेल्या सादरीकरणाने प्रेक्षकांना आनंद दिला. विजेत्यांना अनाम प्रेम परिवाराचे सतीश नगरे,हेलन केलर संस्थेचे सीईओ योगेश देसाई, शिक्षण संचालक अनुराधा बागची आणि उपप्राचार्य प्रिया गोन्सालवीस, अनाम प्रेम परिवाराचे, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक नितीन पानसे, लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाच्या समारोप समारंभात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरी वादक पंडित केशवजी गिंडे आणि सतार वादक विदुषी जयाताई जोग यांनी सादर केलेल्या सांगितीक मैफलीत विकलांग मुलेमुली मंत्रमुग्ध होवून त्यांचे चेहऱ्यावर हास्य खुलले. दरम्यान,सौरभ नगरे यांनी रूद्रवीणा वादन केले. अनाम-प्रेम संस्थेतर्फे अशा मुलामुलींवर गीतसंगीतातून मतिमंदत्वावर उपचार करण्याचे प्रयोग आशादायक ठरत असल्याचे अनाम प्रेम परिवाराचे तसेच सुमती ग्राम ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे आशुतोष ठाकूर यांनी यावेळी सांगितले. लोणावळा ग्रामीण चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,माजी उपनगराध्यक्ष तथा समाजसेवक धीरूभाई कल्याणजी,समाजसेवक नंदकुमार वाळंज, वरसोलीचे सरपंच संजय खांडेभरड, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे,तबला वादक मनोज कदम,चैतन्य जेली स्विटस चे नितिन वाडेकर आदिं मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमास अनाम प्रेम परिवाराचे लोणावळा येथील संतोष पाळेकर,सारिका पाळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.अरुण माळी,तळेगाव दाभाडे येथील नितिन पानसे तसेच मुंबई येथील अंजली ठाकुर, शीतल सावंत, नूतन देशपांडे, सतीश नगरे, हीमा नगरे, अनुप सामंत व इतर अनाम प्रेम परिवारातील सदस्यांचे व मातीकाम कौशल्य विकास चे किरण त्रिलोकी जी यांचे विशेष सहकार्य लाभले




