लोणावळा नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा 7.0 वसुंधरा दिननिमित्त खंडाळा येथे विशेष स्वच्छता मोहिम

मावळ मराठा न्युज -लोणावळा नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा 7.0 वसुंधरा दिन विशेष स्वच्छता मोहिम स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना.) तसेच माझी वसुंधरा 7.0 अंतर्गत वसुंधरा दिन (पृथ्वी दिन) निमित्त लोणावळा नगरपरिषदेमार्फत विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.ही स्वच्छता मोहिम सकाळी ७.०० वाजता खंडाळा तलाव, लोणावळा येथून सुरू होऊन राजमाची गार्डन पर्यंत राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे तलाव परिसर तसेच पर्यटन स्थळांची स्वच्छता करण्यात आली.या उपक्रमामध्ये मा. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मा. उपनगराध्यक्ष देविदास कडू, मा.आरोग्य समिती सभापती धनंजय काळोखे, मा.पाणीपुरवठा समिती सभापती जीवन गायकवाड तसेच नगरसेवक निखिल कवीश्वर, मंगेश मावकर, जाकीर खलिफा, अनिल गवळी, मुकेश परमार नगरसेविका भाग्यश्री जगताप, आरती तिकोने यांची उपस्थिती लाभली. यासोबतच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार बंधू-भगिनी तसेच लोणावळा नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.तसेच लोणावळा नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, मुकादम व सफाई मित्र यांनी सक्रिय सहभाग नोंदवून मोहिमेचे यश सुनिश्चित केले.या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून “स्वच्छ शहर – सुंदर शहर” या संकल्पनेला अधिक बळकटी मिळाली आहे. आपली पृथ्वी – आपली जबाबदारी स्वच्छ लोणावळा, हरित लोणावळा

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page