मावळ मधून श्रीरंग अप्पा बारणे यांची हॅट्रिक,९६ हजार ६१५ मतांनी विजयी,पिंपरी,चिंचवड,पनवेल मावळ मधून भरघोस मतदान
मावळ मराठा न्यूज:- मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सरळ सामना होता पहिल्या एक दोन फेरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे आघाडीवर होते.कर्जत मध्ये जवळपास १७ हजाराहून अधिक मताधिक्य होते.पिंपरी चिंचवड चा मतदारांनी श्रीरंग अप्पा बारणे यांना केलेल्या भरभरून मतदानाचा लीड संजोग वाघेरे तोडू शकले नाहीत. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे ९६ हजार ६१५ मतांनी विजयी झाले. श्रीरंग बारणे यांना ६ लाख ९२ हजार ८३२ तर वाघेरे यांना ५ लाख ९६ हजार २१७ मते मिळाली आहेत. बारणे यांना पिंपरी, चिंचवड, मावळ आणि पनवेलमध्ये तर वाघेरे यांना कर्जत आणि उरणमधून मताधिक्य मिळाले आहे.
पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळमध्ये लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघ
श्रीरंग बारणे – १ लाख ५० हजार ९२४
संजोग वाघेरे – १ लाख १९ हजार ८८६
बारणे आघाडी – ३१ हजार ३८
कर्जत विधानसभा
श्रीरंग बारणे – ७५ हजार ५३४
संजोग वाघेरे – ९३ हजार १९४
वाघेरे आघाडी – १७ हजार ६६०
उरण विधानसभा
श्रीरंग बारणे – ९१ हजार २८५
संजोग वाघेरे – १ लाख ४ हजार ५३५
वाघेरे आघाडी – १३ हजार २५०
मावळ विधानसभा
श्रीरंग बारणे – ९४ हजार ८००
संजोग वाघेरे – ८९ हजार ८३५
बारणे आघाडी – ४९३५
चिंचवड विधानसभा
श्रीरंग बारणे – १ लाख ८६ हजार २३५
संजोग वाघेरे – १ लाख ११ हजार ४७०
बारणे आघाडी – ७४ हजार ७६५
पिंपरी विधानसभा
श्रीरंग बारणे – ९३ हजार ३२३
संजोग वाघेरे – ७६ हजार ५९२
बारणे आघाडी – १६ हजार ७३१