टाकवे शाळेत दत्ताशेठ गायकवाड यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप

मावळ मराठा न्युज :-टाकवे,जिल्हा परिषद शाळेत दत्ताशेठ तुकाराम गायकवाड यांच्या तेराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कै.दत्ताशेठ गायकवाड यांचे 13 वे पुण्यस्मरणार्थ या निमित्ताने माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड यांच्यातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या, पेन व खाऊचे वाटप उत्साहात करण्यात आले, यावेळी कान्हे गावचे मा.सरपंच p0,शिलाटणे गावचे माजी .उपसरपंच पांडुरंग येवले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप मालपोटे, माजी .अध्यक्ष चंद्रकांत असवले व कै.दत्ताशेठ गायकवाड स्नेह ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अतुल गायकवाड यांनी आभार मानले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page