भाजप नेत्या मेधा कुळकर्णी यांनी पुणे स्टेशन येथे केलेल्या अचानक पाहणीत सुरक्षेच्या गंभीर त्रुटी उघड

मावळ मराठा न्यूज -पुणे | प्रतिनिधी हर्षल आल्पे पुणे रेल्वे स्टेशन येथे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नेत्या मेधा कुळकर्णी यांनी केलेल्या अचानक पाहणीत स्टेशन परिसरातील अनेक उणिवा उघड झाल्या.पाहणीदरम्यान स्टेशन परिसरात सर्वत्र अस्वच्छता, अनधिकृत हालचाली आणि सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा दिसून आला. विशेषतः प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याचे निदर्शनास आले. यामुळे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या स्थानकावर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.मेधा कुलकर्णी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या त्रुटी तात्काळ दूर करण्याच्या सूचना दिल्या असून, प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, स्टेशन परिसरात स्वच्छता आणि सुरक्षा यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणावर रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली तरी. खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्वतः रेल्वे मंत्र्यांकडे हा सगळा अहवाल देणार असल्याचे सांगितले आणि रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाची तक्रार रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करणार असल्याचे ही नमूद केले. मात्र, या पाहणीनंतर आता रेल्वे प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार, याकडे पुणेकरांचे आणि समस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page