आधार फौंडेशन लोणावळा चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश भाऊ पाठारे यांच्या संकल्पनेतुन ५१ व्या महिन्याचे धान्य किट वाटप संपन्न

मावळ मराठा न्युज:- लोणावळा, शनिवार दि.३०/१२/२०२३,निराधार व आर्थिक दृष्टया दुर्बल कुटुंबांना धान्य व इतर दैनंदिन वापराच्या वस्तु विना मुल्यवाटप करण्यात आले आहे. आधार फाऊंडेशन लोणावळा संस्थेच्या वतीने ५१ व्या महिन्याचे धान्य किट विरुगुळा केंद्रात लोणावळा येथे वाटप करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय गांधी योजना मावळ तालुका सदस्य श्री संतोष गिरी,कैवल्यधाम योग प्रशिक्षकश्री निरज सिंग ,श्री विठ्ठल देशमुख,उद्योजक,श्री संतोष धोंगळे,श्री पानगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात आधार फाऊंडेशन चे सदस्य कै जयराज डिकाव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .आधार फाउंडेशनच्या सदस्यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला .संजय गांधी निराधार योजना मावळ तालुका सदस्य संतोषजी गिरी यांनी विविध योजनां विषयी माहिती दिली .कैवल्यधाम संस्थेचे योग प्रशिक्षक श्री सिंग यांनी योगाभ्यास विषयी मार्गदर्शन केले .आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश पाठारे यांनी फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रमांची माहिती देत उपस्थितांचे आभार मानले .तसेच आधार फौंडेशनच्या सामाजिक कार्यास प्रभावित होऊन नवीन सभासद फौंडेशनमध्ये सहभागी झालेत. श्री प्रकाशभाऊ पाठारे ,श्री पांडुरंग तिखे,श्री विठ्ठल जाधव, श्री भगवान घनवट, श्री शशिकांतजी खंडेलवालश्री हनुमंत साबळे,सौ मनिषा भांगरे,श्री अब्बासभाई खान,श्री प्रफुल खंडेलवाल,श्री राजेंद्र लाड,श्री दत्ताभाऊ लाड, श्री राजुभाई शेख,श्री उत्तम ठाकर, श्री अस्लमभाई सय्यद,श्री गणेश जाधव,श्री बापु कुलकर्णी, श्री गोरख चौधरी,श्री जयवंत नलोदे,श्री बाळासाहेब लोहिरे,श्री प्रमोद बंसल,श्री किशोर पंड्या,सौ शारदाताई आगरवाल , संध्या गव्हले ,मृदुला पाटील ,सुमती पिंजण ,ज्योती रांगणे , ढाकोळ मावशी आदि सर्व आधार फौंडेशनचे सदस्य यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. लोणावळा परीसरातील गरजु कुटुंंबांना आपल्या मदतीची गरज आहे. जर आपल्याला वस्तु स्वरूपात किंवा देणगी स्वरूपात मदत करण्याची ईच्छा असेल त्यानी आधार फौंडेशन लोणावळा संस्थेशी संंपर्क करावा.प्रकाश भाऊ पाठारे ९८८१०२४०४८ पांडुरंग तिखे ९८२३४७९९६ विट्टल जाधव ९२२६८३८१५० भगवान घनवट ९८९०८०११९८

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page