काळे कॉलनीतील पाणी सोडण्याची वेळ बदला – ऍड.सचिन काळे याची नगरपरिषदेकडे मागणी.

मावळ मराठा न्युज :-आळंदी,येथील काळे काँलनीत अनेक महिन्यापासून नगरपरिषद रात्री १२ .३० ते १ .०० वाजेपर्यंत पाणी सोडते, यामुळे अनेक नागरिकांना रात्री पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. त्यामुळे नागरिकांनी पाण्यासाठी जागरण केल्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते, शिवाय मुलांना सकाळी शाळेत जाण्यासाठी उशीर होतो, मुलांची शाळेला दांडी होते त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान ही होते व पालकांनाही रात्रीच्या जागरणामुळे कामावर जाता येत नाही आणि पाण्याच्या अवेळी येण्यामुळे कामावर व आरोग्यावर परिणाम होतो नगरपरिषदेने पाण्याची वेळ बदलावी आणि नागरिकाची होणारी गैरसोय त्वरित थांबवावी अशी मागणी नगर परिषदेचे नगरसेवक ऍड.सचिन काळे, अनंत काळे, यांनी निवेदनातून केली आहे

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page