नंदू शेठ लांडे यांना आदर्श चेअरमन पुरस्कार तर अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचा ‘भारत रत्न सहकारिता’ पुरस्काराने गौरव








मावळ मराठा न्युज – भोसरी ,पुणे : दिनांक ६ जून रोजी भारत को-ऑपरेटिव्ह बँकिंग संस्थेच्यावतीने लखनौ येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे अध्यक्ष नंदू शेठ लांडे यांना आदर्श चेअरमन पुरस्कार मिळाला आहे तर बँकेस प्रतिष्ठेचा ‘भारत रत्न सहकारिता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बँकेला एकाच वेळी दोन पुरस्कार मिळाल्याने सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.दोन पुरस्कारांचा बहुमानउत्कृष्ट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक पुरस्कार अण्णासाहेब मगर सहकारी बँकेला या श्रेणीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ट चेअरमन पुरस्कार म्हणून बँकेचे अध्यक्ष नंदूशेठ विठोबा लांडे पाटील यांना या वर्षीचा आदर्श चेअरमन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सेहेचाळीस बॅंकांनी सहभाग घेतला होता.बी.एन.सी आणि बँकर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतकूप अंतर्गत हे पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यात बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह स्वीकारले.या वेळी संचालक गणेश पवळे,संतोष भांगरे , रामदास काळजे , राजू सस्ते व बँक व्यवस्थापक माणिक येळवंडे यांनी सदर प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला . या प्रशिक्षण शिबिरात बँकेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शिबीरार्थींना सहकार, व्यवस्थापन व बँकिंग क्षेत्रातील विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. सहकारी बँकिंग अधिक सक्षम करण्यासाठीच्या नव्या संकल्पनांवर यावेळी चर्चा झाली. सदर पुरस्कार प्राप्त होताच बँक पदाधिकाऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. हा दुहेरी सन्मान म्हणजे बँकेच्या सर्व संचालक मंडळ, कर्मचारी आणि ग्राहकांच्या विश्वासाचे फळ असल्याची भावना अध्यक्ष नंदूशेठ विठोबा लांडे पाटील यांनी व्यक्त केली. ‘भारत रत्न सहकारिता’ सारख्या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने बँकेच्या कामाची दखल घेतली गेल्याने भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे, असेही ते म्हणाले.या यशाबद्दल अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे सर्व शाखेच्या स्तरातून अभिनंदन होत आहे.



