*पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने सरकारी वकील ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ संपन्न*








मावळ मराठा न्युज – पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : १२ जुलै २०२६) पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने शुक्रवार, दिनांक ११ जुलै २०२६ रोजी सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ नेहरूनगर, पिंपरी येथील न्यायालयातील सभागृहात (बार रूम) संपन्न झाला. याप्रसंगीव्यासपीठावर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे, महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विकास ढगे पाटील, माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. एस बी चांडक, ॲड. सुहास पडवळ, ॲड. सुनील कडूसकर, ॲड. जे के काळभोर, ॲड. आतिश लांडगे, ॲड. राजेश पुणेकर आदी उपस्थित होते. यावेळी ॲड. साधना बोरकर यांचा ॲड. विकास ढगे पाटील, ॲड. गौरव वाळुंज, ॲड. सतिश गोरडे आणि ॲड. संजय दातीर पाटील यांचे हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे यांनी, ‘ॲडव्होकेट साधना बोरकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वांत उल्लेखनीय गुण म्हणजे त्यांचा सेवाभाव असून सरकारी वकील म्हणून त्यांनी केवळ आपल्या पदाची जबाबदारीच पार पाडली नाही; तर न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रतही जपले. पक्षकारांना न्याय मिळावा, दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि कायद्याचे राज्य अधिक सक्षम व्हावे, यासाठी त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थ वृत्तीने कार्य केले!’ असे गौरवोद्गार काढले.ॲड. सुहास पडवळ यांनी त्यांचे मनोगतात, ‘ॲड. बोरकर यांच्या कामामध्ये कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता, अभ्यासूवृत्ती आणि मानवी मूल्यांचा सुंदर संगम दिसून येतो. न्याय हा केवळ कायद्याच्या चौकटीत मर्यादित नसून तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, ही त्यांची भूमिका त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. त्यामुळे त्या केवळ एक सक्षम सरकारी वकील नाहीत, तर समाजाभिमुख, सेवाभावी आणि न्यायनिष्ठ अधिकारी म्हणून सर्वांच्या आदरास पात्र ठरल्या आहेत!’ असे विचार व्यक्त केले. महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विकास ढगे पाटील, ॲड. एस बी चांडक, ॲड. सुनील कडूसकर, ॲड. जे के काळभोर, ॲड. रामराजे भोसले, ॲड. सचिन थोपटे, ॲड. आतिश लांडगे, ॲड. राजेश पुणेकर, ॲड. किरण पवार, ॲड. विकास पोटघन ॲड. योगेश थांबा, ॲड. प्रतीक जगताप, ॲड. जयश्री कुंटे, ॲड. कांता गोर्डे, ॲड. रूपाली वाघिरे, ॲड. अनिल शिंदे, ॲड. सुदाम साने, ॲड. संजना माने यांनीदेखील मनोगते व्यक्त केलीत. सरकारी वकील ॲड. राठोड यांनी, ‘आज आपण एका अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांनी आपल्या ज्ञान, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर न्यायव्यवस्थेत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे!’ अशा भावना व्यक्त केल्या. ॲड. मंगेश खराबे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. विश्वेश्वर काळजे यांनी आभार मानले. ॲड. अनिल पवार, ॲड. राकेश जैद, ॲड. शंकर घंघाळे, ॲड. अरविंद नखाते, ॲड. सी एम माने, ॲड. धीरज कुचेरिया, ॲड. आशिष गोरडे, ॲड. शंकर पल्ले, ॲड. प्रसन्न लोखंडे यांनी संयोजनात सहकार्य केले.



