“वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा”अंतर्गत स्वच्छता मोहीम उद्या चलो भुशी डैम ,सत्य कार्तिक यांचे आवाहन

मावळ मराठा न्यूज,लोणावळा,पुणे ग्रामीण,जिल्हा पोलिस,लोणावळा उपविभाग आयोजित “वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा” अंतर्गत स्वच्छता मोहीम पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,पुणे ग्रामीण चे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या वेहेरगाव येथील आई एकवीरा देवी मंदिर आणि बौद्धकालीन लेणी परिसर स्वच्छ करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या लोहगड किल्ला आणि परिसर येथे स्वच्छ्ता मोहीमेला पोलीस अधिकारी ,कर्मचारी, नागरिक, वकील, सामाजिक संस्था,शिवदुर्ग मित्र,लोणावळा शहर पत्रकार संघ यांनी आणि गड कोट किल्ले प्रेमी यांनी भरभरून प्रतिसाद देत तेथील कित्येक टन कचरा संकलित करून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. दिनाक १० मे लायन्स पॉइंट, येथील धार्मिक स्थळ शिवलिंग पॉइंट येथे स्वच्छता मोहीम राबविन्यात आली. आता लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आय पी एस सत्य साई उद्या दिनाक १७ मे रोजी बुधवार रोजी सकाळी ६ .३० वाजता पर्यटकांचे आकर्षण असलेला भुशी डैम आणि परिसरात स्वच्छ्ता मोहीम राबवली जाणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. यावेळी सायबर सुरक्षा यावर पथ नाट्य सादर करून जनजागृती केली जाणार आहे. तरी लोणावळा शहर आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर राहून आपला परिसर ,आपले लोणावळा आपली पर्यटन स्थळे,गड कोट किल्ले ,मंदिरे स्वच्छ ठेवण्यासाठी “वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा” या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवावा असे आवाहन लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे




