मावळच्या कन्येची बार कौन्सिलवर दमदार झेप: अँड रंजना भोसले यांचे लोणावळ्यात जल्लोषात स्वागत!

मावळ मराठा न्युज-लोणावळा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, मावळ तालुक्यातून प्रथमच अँड. रंजनाताई भोसले यांनी घवघवीत यश संपादन करत उपाध्यक्षपदावर निवड होण्याचा मान मिळविला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, लोणावळा येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.अँड.रंजनाताई भोसले लोणावळा येथे आगमन होताच शिवाजी महाराज चौकात त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज असे महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या स्वागत सोहळ्यास लोणावळ्यातील वकील, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत त्यांच्या विजयाचा आनंद साजरा केला.यावेळी अँड.प्रफुल सोनावणे, अँड. मोनाली कुलकर्णी, अँड. प्रफुल लुंकड, अँड. दीपक चौधरी, अँड. धनंजय कोडरे, अँड.राजेश ओसवाल, अँड.संजय गायकवाड, अँड. आकाश सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.अँड. रंजना ताई भोसले यांनी आजवर सामाजिक, कायदेशीर आणि सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तळेगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. विविध क्षेत्रांतील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे समाजात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वामुळेच त्यांना हा बहुमान प्राप्त झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.मावळ तालुक्यातून प्रथमच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या सर्वोच्च विधिज्ञ संस्थेवर प्रतिनिधित्व मिळाल्याने संपूर्ण मावळ परिसरासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page