ॲड अभिजित खोत यांच्या लाक्षणिक उपोषणाला वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्सने दिला जाहीर पाठिंबा

मावळ मराठा न्युज:- वडगांव,ॲड अभिजित खोत, कोल्हापूर यांचे वकिलांच्या विविध मागण्यासाठी राजस्थान व कर्नाटक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करणे, ज्युनिअर वकिलांना स्टा ईपेंड, वकिलांना आरोग्य विमा,वकील वेल्फेअर फंड, वकिलांना कर्ज सुविधेची मर्यादा वाढविणे आदी मागण्या बाबत वडगांव मावळ कोर्टासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणेत आले. त्यास वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स चे वतीने पत्र देऊन जाहीर पाठिंबा देणेत आला. त्यावेळी अध्यक्ष ऍड सोमनाथ पवळे, ॲड संतोष गुंजाळ, ॲड अतुल निंबले, ॲड सातकर, ॲड मोझेस बनसोडे, ॲड किरण म्हस्के,ॲड खोत यांनी आजतागायत ९ जिल्ह्यामध्ये एकदिवसीय उपोषण केले आहे.आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page