*नूतन विद्यामंदिर, तळेगाव यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न*

मावळ मराठा न्युज – तळेगाव,शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी नूतन विद्यामंदिर माजी विद्यार्थी स्नेह मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला!
लायन्स क्लब तळेगावच् सुवर्ण महोत्सव गाजवणारे- लायन दिपक बाळसराफ, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे व संजय शिंदे यांच्या मनात- आपल्या इयत्ता दहावी- सन ८० – ८१ – बॅचच्या सर्व मित्रांना एकत्र आणून- प्रत्येकाने सोसलेल्या आपल्या खडतर भूतकाळाचा आनंद वर्तमान काळात- याची देही याची डोळा- अनुभवावा या उद्देशाने- फक्त एक आठवड्यापूर्वी आपल्या मित्र मैत्रिणींशी संपर्क साधला! त्याला मूर्त स्वरूप आले तो दिवस होता- व्हॅलेंटाईन डे म्हणजे शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ !शनिवारच्या अल्हाददायक सकाळी या आनंद मेळाव्यात सहभागी होणाऱ्या सर्वांचं — गुलाब पुष्पाने स्वागत करण्यात आलं!- त्यानंतर प्रत्येकाने स्वादिष्ट ब्रेकफास्टचा आनंद घेतला!- बँडच्या उत्साहवर्धक संगीतात- आकर्षक रंगीत फेटे परिधान करून शाळेच्या प्रांगणात शिस्तबद्ध नृत्य सादर करून मिरवणुकीत उपस्थित विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती सादर केली! आकर्षक कलात्मक रांगोळी प्रदर्शनाबरोबरच सुगंधित अंत्तराने सभागृहात सुहास्य वदनाने- प्रमुख पाहुणे-ज्येष्ठ लेखक- वक्ते डॉक्टर शालिग्राम भंडारी आणि या बॅचच्या विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास करणाऱ्या- शिक्षकांच सहर्ष स्वागत करण्यात आल! शाळेतर्फे दीप्ती बरमुख मॅडम आणि माजी विद्यार्थ्यांतर्फे अरुण उबळे यांनी समारंभाचे प्रास्ताविक सादर केले! या समारंभाचे मुख्य संघटक- लायन दिपक बाळसराफ यांनी- अतिशय मोजक्या मधाळ शब्दात प्रमुख वक्ते- डॉक्टर शालिग्राम भंडारी सरांची ओळख करून दिली! डॉक्टर भंडारी सरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना- सर्वप्रथम या आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या आनंद मेळाव्यात आपल्याला सामील करून घेतल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली! आपापल्या क्षेत्रात स्वकर्तुत्वाने विलक्षण उंची गाठलेल्या- आपणा सर्वांकडून समाज एक अपेक्षा करीत आहे ती म्हणजे- आपण टाईम- टॅलेंट आणि ट्रेझर या पैकी कुठलंही एक योगदान समाजाला देण्याचा संकल्प आपण आज सोडायचा आहे! हा आपला विचार अधिक स्पष्ट करताना– डॉक्टरांनी अनेक शेरो शायरी- काव्यपंक्ती आणि दृष्टांताचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले! डॉक्टर भंडारी आणि शिक्षकांचा यथोचित सन्मान झाल्यानंतर- शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्यात! या समारंभाचे मुख्य प्रवर्तक- दीपक बाळसराफ यांनी आपल्या संवेदनशील भावना व्यक्त करताना म्हटले की –ही मेळावा भरवण्याची सुवर्ण संधी माझ्या या मित्रांनी मला दिली- त्यासाठी सर्वतोपरी सहकार्यही आपण मला दिलेत– त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्या शब्दकोशात शब्द नाही! आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त– प्रतिसादामुळेच हा शाळे-विषयी आणि गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुवर्ण कांचन योग आपण याची देही याची डोळा अनुभवू शकलो! तळेगाव नगरीचे माजी अध्यक्ष- या बॅचेचे विद्यार्थी सुरेश धोत्रे यांनी- आपल्या शाळेतील काही गोड आठवणी विशद करून आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की- अतिशय खडतर असलेला आम्हा सर्वांचा भूतकाळ- आपल्या सारख्या गुरुजनांच्या ज्ञानामृतातून- आमचा वर्तमान मात्र अत्यंत मधाळ आनंददायी झालेला आहे. हे व्यक्त करताना मला विशेष आनंद होत आहे-!याबरोबरच- नंदकुमार नागुल पिल्ले,सौ सुरेखा पंडित दौंडे- सौ सुनंदा कुलकर्णी- सौ दीपा भेगडे- ढमढेरे- सौ सुविधा नाईक करमरकर या विद्यार्थिनींनीही आपल्या भावना अत्यंत भिज शब्दात व्यक्त केल्या!या समारंभात – आपल्या विद्यार्थ्यांन प्रति अभिमानास्पद असलेल्या भावना व्यक्त करणारे- खालील शिक्षक उपस्थित होते.श्री अभय निमये सर, श्रीमती विशाखा टूमणे मॅडम,श्री चंद्रकांत मुळे सर,श्री प्रभाकर वाघचौरे सर,श्री रमेश जाधव सर,विनया कोल्हटकर मॅडम, आशा औंढेकर मॅडम, सौ सुनंदा कुलकर्णी मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी- श्री यशवंत आणि श्री गंगाराम भेगडे ही सर्व मंडळी अत्यंत उत्साहाने उपस्थित होते!हा माजी विद्यार्थी आनंद मेळावा यशस्वी करण्यास दिपक बाळसराफ व संजय शिंदे यांच्या अथक प्रयत्नांना ज्यांचे अनमोल सहकार्य लाभले ते म्हणजे– तळेगावचे माजी नगराध्यक्ष सुरेशजी धोत्रे याबरोबरच माजी विद्यार्थिनी सौ विद्या नाईक, सौ अंजू कुलकर्णी, श्री गणेश गुंड,श्री ललित ओसवाल, श्री रणजीत ओसवाल, श्री प्रवीण पाटील, श्री केतन बरमुख, श्री अरुण उबाळे आणि मित्रवर्य विनायक हेंद्रे यांचे विशेष सहकार्य लाभले. श्री विनायक हेंद्रे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानल्यानंतर- सुग्रास भोजनाने या अविस्मरणीय समारंभाची सांगता करण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page