*लोणावळ्यातील गायकांनी ज्येष्ठ गायिका पदमश्री स्व. सुमन कल्याणपूर यांना वाहिली संगीतमय आदरांजली*










मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोनवळ्यातील निवडक 10 गायीकांनी स्व. सुमन कल्याणपूर यांच्या गीतांच्या वर आधारित कार्यक्रम ‘स्वर सुमन’ सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेस्व. सुमन कल्याणपूर यांचे लिबोनीच्या झाडामागे, बेहनाने भाई के कलाई पे, तुझ्या कांतीसम, मेरे मेहबूब ना जा केतकीच्या बनामध्ये तसेच किशोर व रफी साहेबांबरोबर गायलेली अप्रतिम गाणी सादर केली आयोजक प्रदीप वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळ्यातील गायिका मीनाक्षी गायकवाड, मंगल राणे, ऍड एलीझाबेद वाळंज, किरण कुलकर्णी, सोनिया खोब्रागडे, नेहा ओसवाल, किरण स्वामी, वर्षा गायकवाड, वर्षा परदेशीं, निशा नाईक, सुनील पाणगावकर व प्रदीप वाडेकर यांनी गिते सादर केली निवेदिका ऍड. मोनाली कुलकर्णी यांनी स्व. सुमन कल्याणपूर यांचा जीवनपट निवेदनातून उलगडालाकार्यक्रमाला लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष धीरूभाई कल्याणजी, ज्येष्ठ पत्रकार सी बी जोशी, भाजपा लोणावळा नाणे मंडल अध्यक्ष अनिल गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा मृदुला पाटील, मावळ वार्ता फाउंडेशन चे सचिव बापूलाल तारे, लोणावळा भाजपा महिला आघाडी अध्यक्षा पारिजा भिलारे, राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षा उमा मेहता,पार्वती रावल, चारूलता कमलवार, होगले ताई, ज्येष्ठ नागरिक संघांचे उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, संध्या गव्हाले प्रतीक्षा महाडिक, सुरेश गायकवाड, राजेश मेहता, पत्रकार प्रशांत पुराणिक, शत्रुघन खंडेलवालश्रिया रहाळकर, आदिसह अनेक प्रेक्षक उपस्तिथ होते कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ निवेदक बापूलाल तारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.. या अप्रतिम कार्यक्रमात प्रेक्षक शेवट पर्यंत खिळून होते



