शिवसेवा प्रतिष्ठान’च्या वतीने’वंदे मातरम १५०’ धगधगती गाथा एका राष्ट्रमंत्राची,हा कार्यक्रम उत्साहात संपन्न








‘मावळ मराठा न्युज-लोणावळा,वंदे मातरम या स्वातंत्र्य मंत्राच्या १५० व्या जयंती वर्षानिम्मीत्त ‘शिवसेवा प्रतिष्ठान’ आयोजित ‘वंदे मातरम १५०’ हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात लोणावळा येथे सादर करण्यात आला.१९ ऑगस्ट २०२५ ची सकाळ उजाडली तीच मुळी मुसळधार व संततधार पावसाने त्यात शिवसेवा प्रतिष्ठान ने आयोजित केलेला धगधगती गाथा एका राष्ट्रमंत्राची वंदे मातरम १५० हा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता. सायंकाळी पावसाचा जोर अजूनच वाढला पण पावसाला घाबरतील ते दर्दी लोणावळेकर कसले. देशभक्त लोणावळेकरांनी अगदी वेळेत व मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाला अनेक डॉक्टर,वकील,आर्कीटेक्ट,व्यावसाईक तसेच लोणावळ्यातील अँड बापूसाहेब भोंडे हायस्कूल,डॉ. बी.एन.पुरंदरे विद्यालय,व्ही. पी. एस. हायस्कूल या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी यांनी सुद्धा उपस्थिती लावली.विशेष म्हणजे अगदी कामशेट,कांबरे, कुसगाव येथुनही लोक सहकुंटुब आले होते.उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन शिवसेवा प्रतिष्ठान चे सचिव श्री. राजेश कामठे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात अग्रसेन सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.राजीव अग्रवाल व श्री. नारायणजी पाळेकर यांच्या हस्ते भारत माता पूजन व दीप प्रज्ज्वलनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय सौ.राजेश्री कानडे यांनी उत्साहवर्धक शब्दांमधे केले. याच कार्यक्रमात वंदे मातरम चे गाढे अभ्यासक, लेखक श्री. मिलिंद सबनीस यांचा सत्कार लोणावळा कॉलेज चे प्राचार्य डॉ.नरेंद्र देशमुख यांनी सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन केला. यानंतर कार्यक्रमाचे दिग्दर्शक श्री.प्रसाद कुलकर्णी व श्री. प्रदीप फाटक यांचा सत्कार संस्थेचे संचालक श्री.प्रमोद देशपांडे यांनी केला. मल्हार प्रोडक्शनच्या श्री.अभिषेक खेडकर श्री. प्रदीप फाटक व सौ.अवंती लोहकरे यांनी अप्रतिम असा माहीतीपर अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रम बहारदार पद्धतीने सादर केला. या कार्यक्रमांमध्ये बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम या एकमेव काव्याचा ज्या काव्याचा नंतर स्वातंत्र्यमंत्र झाला त्याच्या जन्मापासुन १५० वर्षांचा इतिहास व प्रवास अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता मंत्रमुग्ध अशा संपूर्ण वंदे मातरम ने झाली. शेवटी शिवसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.धनंजय चंद्रात्रे यांनी सर्व लोणावळेकरांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसेवा प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते धनंजय चंद्रात्रे, अजित घमंडे, राजेश कामठे, सुनील व्हरांबळे, राजेश येवले, प्रमोद देशपांडे,भगवान गायकवाड,राजेश्री कानडे, रितेश गुप्ता, ऋषिकेश लेंडघर, कुणाल लालगुडे.प्रशांत हरिश्चंद्रे यांचे कार्य मोलाचे ठरले.



