श्री.जगजीवन मोढोरिये यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

मावळ मराठा न्युज – मावळ,ओवळे-मावळ तालुक्यातील ओवळे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक-श्री.जगजीवन मोढोरिये यांना ओवळे गावातील श्री.म्हसोबा मित्र मंडळ ओवळे यांच्या वतीने आदर्श  ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मा.श्री.जगजीवन मोढोरिये साहेब यांनी ओवळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक असताना त्यांच्या कार्यकाळात ओवळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनां गावामध्ये राबवुन ओवळे गावच्या विकासासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तसेच मावळ तालुक्यामध्ये ओवळे गावाचे नाव मोठे केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन श्री.म्हसोबा मित्र मंडळाच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page