वसंत व्याख्यानमाला,लोणावळा पहिले पुष्प!काश्मीर समस्या समजून घेण्यासाठी तेथील भूगोल समजून घ्यावा लागेल – विनायकराव परब

मावळ मराठा न्यूज – लोणावळा,वसंत व्याख्यानमाला लोणावळाचे पहिले पुष्प गुंफतानाकाश्मीर प्रश्नावर एक दशक हून अधिक काळ अभ्यास करणारे जेष्ठ आणि संरक्षण पत्रकार विनायकराव परब यांनी काश्मीर,चीन,भारत यावर बोलताना काश्मीर प्रश्न समजून घेण्यासाठी तेथील भूगोल समजून घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. वसंत व्याख्यानमाला लोणावळा दिनांक २३ एप्रिल पासून प्रारंभ झाली यात पहिले पुष्प जम्मू काश्मीर समस्यांवर गेली १० वर्षे अभ्यास करणारे संरक्षण पत्रकार विनायाराव परब यांनी काश्मीर चीन भारत यावर आपले अभ्यास पूर्वक स्लाइड च्या माध्यमातून दुर्मिळ अशी फोटो ,तेथील भूगोल आणि काही प्रसंग अगदी साध्या, सरळ भाषेत समजावून सांगत असताना अनेकदा तेथील नागरिक देशासाठी कसे मर मिटायला तयार होतात त्यावेळी परब भावूक ही झालेत.काश्मीर हा बर्फाळ प्रदेश आहे तेथील तापमान हे उने ३० ते ७० असते.अश्या परिस्थितीत आपले जवान आपली जबाबदारी कशी चोख बजावतात ,चीन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे तर आपले सैन्य ते आपला भाग अबाधित राखण्यासाठी झटत आहेत. देशाचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळात संरक्षण दलात अमुलाग्र बदल केलेत. त्यामुळे जम्मू काश्मीर मधील सद्भावना अभियानामुळे अनेक स्थानिक नागरिक सैन्य दलाच्या मदतीसाठी पुढे आलीत. सरस्वती पूजन दीप प्रज्वलन आणि सुमधुर ईशस्तवन गाऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व्यासपीठावर वसंत व्याख्यान माला समितीचे अध्यक्ष प्रमोद देशपांडे यांनी पाहुण्यांचे शाल श्रीफळ पुष्प देवून स्वागत केले वसंत व्याख्यान माला ट्रस्ट च्या अध्यक्षा राधिका भोंडे यांनी प्रास्तविक केले तर चित्रा जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी व्यासपीठावर विद्या निकेतन एजूकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष ॲड माधवराव भोंडे,व्याख्यानमाला समिती अध्यक्ष प्रमोद देशपांडे,लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सीताराम डूबल सचिव चित्रा जोशी उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशांत पुरणीक यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page