२७ फेब्रुवारीलां भोंडे हायस्कुल येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशाखा बाल कुमार साहित्य संमेलन


मावळ मराठा न्युज:-लोणावळा येथील ऍड बापूसाहेव भोंडे हायस्कुल इंग्रजी माध्यमाची लोणावळा शहरातील सर्वोत्तम शाळा आणि हिंदू आणि भारतीय संस्कृती जपणारी शाळा असा लौकिक आहे. त्याला साजेसे असे शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम भोंडे हायस्कुल नेहमी राबवत असते. देशातील एकमेव शाळा असेल ज्या शाळेने १४ हजार चौरस फूट जागेवर लोणावळ्यातील विदयार्थी यांना शास्रज्ञ होण्यासाठी भव्य असे विज्ञान केंद्र सुरु केले आहे. येत्या २७ फेब्रुवारीला भोंडे हायस्कुल येथे शहरातील ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोबाईल च्या मागे न लागता वाचन संस्कृती टीकावी,वाढावी आणि आवड निर्माण व्हावी यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशाखा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.या विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट लोणावळा, ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल,कल्पना चावला स्पेस ॲकॅडमी आयोजित मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ मराठी भाषा गौरव दिना निमित्य पहिले विशाखा बालकुमार साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षशर्व गाडगीळ ,नविन शामची आई चित्रपटातिल शाम आणि शामची आई प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध अभिनैत्रि गौरी देशपांडेया निमित्य ग्रंथदिंडी,विविध साहित्यिक कार्यक्रम,ग्रंथ प्रदर्शन आणि नामवंत साहित्यिकां चे अभिप्राय व स्वाक्षऱ्यांचे प्रदर्शन,पुस्तक हंडी हे उपक्रम होणार आहेत .यात मुलांना खाऊसाठी मिळालेल्या पैशातून म्हणजे फक्त ५ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत पुस्तकांची खरेदी विद्यार्थ्याना करता येणार आहे. यावेळी सकाळी वेळ सकाळी ९ ते १२ विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.त्याठिकाणी स्थळाला – कुसुमाग्रजनगरी असे नाव देण्यात येणार आहे.मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी २०२४ ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा येथे पहिल्या विशाखा बालकुमार साहित्य संमेलनाला प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर सौरभ सदानंद चांदेकर यांची राहणार आहे. लोणावळ्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना एक साहित्याची पर्वणीच ठरणार आहे.वि वा शिरवाडकर ग्रंथ दिंडीचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष ऍड माधवराव भोंडे करणार आहेत. या संमेलन मध्ये कोणत्याही भाषेचे बंधन नसल्याने संमेलनाचा उद्देश हा व्यक्त होणे हा असल्याने मुलांना मोठी संधी मिळणार आहे.यात कविता आणि कथा यांचे अभिवाचन होणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन देखील सी व्ही रमण यांच्या आठवणीना उजाळा देत विविध प्रयोगाची प्रत्यक्षिके दाखवून साजरा केला जाणार आहे. दैनंदिन जीवनातील विज्ञानचे प्रयोग सामान्य नागरिकांना कळावे यासाठी लोणावळ्यातील रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज चौक विज्ञानाचे छोटे छोटे प्रयोग दाखवले जाणार आहेत. समाजाला अंधश्रद्धा यावर जागृती आणि विज्ञान याची माहाती सांगितली जाणार आहे.अशी माहिती भोडे हायस्कुल येथे संजय पुजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना दिली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका,मराठी विषयाचा शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या.




