कैवल्यधाम योग संस्थेचे सुबोध तिवारी यांनी घेतली महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत सदिच्छा भेट; राज्याच्या विविध भागांमध्ये योगकेंद्रे उभारणी बाबत सकारात्मक चर्चा

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी गुरुवार दिनांक २ जून २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये महसूल खात्यातील लोकांसाठी योग कसा राबवावा? या संदर्भात चर्चा झाली तसेच महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये योगकेंद्रे उभारणी बाबत सकारात्मक चर्चा घडून आली. कैवल्यधाम योग संस्थेच्या शतकपूर्तीब‌द्दल त्यांनी कौतुक केले आणि पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या भेटीमुळे “योगमय महाराष्ट्र” होईल असा विश्वास श्री सुबोध तिवारी यांनी व्यक्त केला.देशातील कानाकोप-यात विविध उपक्रमांतून योगाचा संदेश पोहचवण्याचा संस्थेचा मानस आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page