*आंतरशालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत डॉ.बी.एन. पुरंदरे बहुविध विद्यालय, लोणावळा च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी*

मावळ मराठा न्युज – लोणावळा,३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर २०२६ रोजी हुतात्मा राजगुरू विद्यालय राजगुरुनगर येथे आंतरशालेय जिल्हास्तरीय मुला मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत डॉ. बी.एन.पुरंदरे बहुविध विद्यालयाच्या आदेश साबळे, शुभ्रा गाडे आणि ज्ञानेश्वरी साबळे यांनी सहभाग घेतला होता. शुभ्रा गाडे आणि ज्ञानेश्वरी साबळे यांनी अनुक्रमे 99 किलो आणि 89 किलो असे वजन उचलत सुवर्णपदक पटकाविले तर आदेश साबळे यानेही आपल्या पहिल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सहभाग नोंदवला.तसेच वरील खेळाडू शिवदुर्ग फिटनेस चे श्री.अशोक मते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.*या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्कृष्ट यशा बद्दल विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page