स्कायवाकसाठी ४१ झाडे तोडली जाणार होती ; नासिरभाई शेख,निसर्ग प्रेमी,पत्रकार यांच्या प्रयत्नांना यश,आता फक्त सहाच झाडी तोडली जाणार वा पुनर्रोपण होणार







मावळ मराठा न्युज -लोणावळा,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष नासिर भाई शेख यांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवत लेखी हरकत नोंदवली होती. मागील तीन चार महिन्यापासून त्यांनी विविध निसर्गप्रेमींच्या तज्ज्ञ यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या या लढ्याला अखेर यश आल्याचे पाहायला मिळाले. पीएमआरडीचे अधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितल्या प्रमाणे नुकतीच नासिरभाई शेख यांच्यासोबत या मार्गावरील रस्त्यांचे संयुक्त पाहणी करत सात मीटर रस्ता बनवताना अडथळा ठरणारी केवळ सहा झाडे ही तोडली जाणार असून अथवा पुनर्रोपण केली जाणार असल्याचे सांगितले.लायन्स पॉईंट या ठिकाणी होणाऱ्या ग्लास स्कायवॉक साठी लोणावळा शहरातून सात मीटर रुंदीचा रस्ता बनवला जाणार आहे. हा रस्ता बनवताना पूर्वीच्या अहवालात १९ झाडे तोडली जाणार होती व २२ झाडांचे पुनर्रोपन केले जाणार होते.परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे लोणावळा शहर अध्यक्ष नासिरभाई शेख यांच्या पाठ पुराव्यामुळे अनेक झाडांना जीवदान मिळाले आहे. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे व पी एम आर डी चे अधिकारी हे दोघेही वृक्ष वाचवण्याच्या सकारात्मक भूमिकेत होते. त्यांनी दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि नासिरभाई शेख,निसर्ग प्रेमी,पत्रकार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.जवळपास ३५ झाडे वाचली आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या कामांमध्ये जी सहा झाडे काढणे क्रमप्राप्त आहे, ती झाडे पुनर्रोपण होऊ शकतात का याचा विचार केला जाणार आहे.हा रस्ता ग्लास स्कायवॉक साठी बनवला जाणार आहे की पुणे ग्रँड टूर या इंटरनॅशनल सायकल शर्यतीसाठी घाईघाईने बनवला जाणार आहे, याबाबत मात्र नागरिकांमध्ये शंका आहे. नासिर शेख व लोणावळ्यातील निसर्गप्रेमी पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या तसेच जागृत पत्रकार यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. येथील निसर्ग व जुनी वृक्षसंपदेचे वैभव कायम राहणार असल्याची भावना नासिर शेख यांनी मावळ मराठा न्यूज़ शी बोलताना व्यक्त केली आहे.



