लोणावळा कनिष्ठ महाविद्यालयात ,राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

मावळ मराठा न्युज – लोणावळा,’Not Me But You’ या ब्रीदवाक्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने केंद्र सरकारने २४ सप्टेंबर १९६९ रोजी राष्ट्रीय सेवा योजना कार्याची सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून भारतातील युवकांना विविध कार्यक्रमात प्रत्यक्षरीत्या सहभागी करण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले. लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे व राष्ट्रीय सेवा योजना +2 च्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात NSS गीताने करण्यात आली.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ नरेंद्र देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात ‘स्वातंत्र्यउत्तरकाळात युवकांना राष्ट्रसेवा व देशसेवा यांच्यात समाविष्ट होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या घोषवाक्यातून ‘Not Me But You’ या अंतर्गत युवकांनी स्वतःला घडविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल. या कार्यक्रमाच्या वेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन शिंगारे यांनी RD परेडचे महत्व विशद केले, या योजनेमध्ये समाविष्ट होऊन व्यक्तिमत्व घडविण्यासाठी , युवकांनी प्रत्यक्ष हिवाळी शिबिरामध्ये सहभाग घेऊन संधीचे सोने केले पाहिजे. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. धनराज पाटील यांनीही प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी मनोगत कुमारी सिद्धी जायगुडे हिने आपल्या शिबिराचे अनुभव कथन केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमांतर्गत प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार श्री श्रीराम कुमठेकर यांनी आपल्या व्याख्यानामध्ये विद्यार्थी जीवनामध्ये शिस्तीशिवाय प्रगती होणे शक्य नाही, शिस्तीत घेतलेले शिक्षण दीर्घकाळ लक्षात राहते, तसेच तर समाजात तुम्हाला मोठी व्यक्ती व्हायचं असेल तर पुढची सात वर्षे ही परिश्रम घेतले पाहिजे. त्यानंतर मनशक्ती केंद्राचे जीवनदायी साधक स्वाती आलूरकर यांनी आपल्या प्रबोधन पर व्याख्यानात Pro -Active होणे, स्वावलंबी जीवन जगणे, कुटुंबातील आई वडील शिक्षक यांचा आदर करणे,मोबाईलचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी करणे असे महत्त्वपूर्ण विषय आपल्या प्रबोधन पर व्याख्यानात विशद केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. पराग कुलकर्णी सर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. रोहिदास राणे सर यांनी केले, या कार्यक्रमास कनिष्ठ विभाग प्रमुख ऍनी वर्गीस मॅडम, प्रा. संजय साळुंखे, प्रा. शशिकला ठाकर, प्रा. वैशाली कचरे, प्रा. तनवी भोंडवे, प्रा. भारतीय राजे भोसले मॅडम, तसेच मोठ्या संख्येने एन. एस. एस. स्वयंसेवक उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रा. रुपाली गवळी मॅडम यांनी केले, व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page