लोणावळा महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जाणून घेतली खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांची दिनचर्या

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे,कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना +2 च्यावतीने,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शना नुसार”स्थळ भेटीचे” आयोजन करण्यात आले होते. स्थळ भेटीचे ठिकाण पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा या ठिकाणी शिक्षक वृंद व स्वयंसेवक यांनी भेटीदरम्यान पोलीस प्रशिक्षणार्थी व होमगार्ड प्रशिक्षणार्थी यांची दैनंदिनी समजून घेतली तसेच तेथील परिसरात अद्यावत क्लास रूम,क्राइम रूम मधील प्रोजेक्ट,अद्यावत मीटिंग हॉल,इ. गोष्टी समजून घेतल्या या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी स्वयंसेवकांना बहुमोल असे मार्गदर्शन पी आय श्री.पवार, श्री, पाटील, पी. एस.आय. वाकडे पी.आय.खरे,पी.एस.आय. सुनील पाटील,गायकवाड,चेतन प्रशिक्षण केंद्रातील उपप्राचार्य स्मिता जाधव,प्रा.श्रीहरी लक्ष्मी पाटील या समारोप प्रसंगी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना सायबर क्राईम,नारी सुरक्षा,बँकेतील सायबर क्राईम,व त्याद्वारे होणारी फसवणूक,मुली व महिलांची होणारी फसवणूक,अशा महत्त्वपूर्ण विषयावर स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. श्री. धनराज पाटील व प्रा. पराग कुलकर्णी यांनी केले होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. वैशाली कचरे प्रा.रूपाली गवळी ,प्रा.राजे भोसले,प्रा.रोहित राणे,प्रा.भावना रावळ प्रा.तनवी भोंडवे ,प्रा.धनश्री यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page