उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त वृक्ष रोपण बाळूमामा देवस्थान येथे दुग्धभिषेक व लोणावळ्यातील स्वयंभू गणेश मंदिर अंबरवाडी येथे महाआरती

मावळ मराठा न्युज -लोणावळा,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा माजी जिल्हाप्रमुख श्री मच्छिंद्र खराडे यांच्या संकल्पनेतून वृक्ष पंधरवडा हा वृक्ष रोपणाचा कार्यक्रम गेली अनेक वर्षे राबवला जात आहे. लोणावळा शहर परिसरात विविध प्रकारचे वृक्ष रोपण करण्यात येते. त्याच प्रमाणे पक्षप्रमुख यांच्या उदंड आयुष्यासाठी लोणावळ्यातील बाळूमामा देवस्थान येथे दुग्धभिषेक व लोणावळ्यातील स्वयंभू गणेश मंदिर अंबरवाडी येथे महाआरती करण्यात आली. ह्या पंधरवडा ची सुरुवात श्री मच्छिंद्रजी खराडे यांच्या हस्ते करण्यात आली. ह्या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक श्री शंकर जाधव,माजी विभाग प्रमुख श्री सुरेश टाकवे,श्री ज्ञानेश्वर जांभूळकर ,श्री सुनिल इंगुळकर, विद्यार्थी सेनेचे माजी तालुकाध्यक्ष श्री महेश खराडे,वाहतूक सेनेचे तालुका संघटक श्री दिनेश वीर,श्री नीलेश गोणते, विभागप्रमुख श्री इंद्रजीत तिवारी श्री सदानंद पिल्लाने,युवा सेनचे सतीश गोनते,अभिषेक इंगुळकर,विजय चौरे, सौरभ कडू,तेजस खराडे,संदीप यादव, श्रीकांत येवले,सुदेश टाकवे गणपती मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त श्री अनंता देशमुख साहेब आदी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page