सांगवी येथे मतदान जनजागृती,जेष्ठ नागरिकांनी घेतली मतदानाची शपथ


मावळ मराठा न्यूज :- सांगवी येथे मतदान जनजागृती राबविण्यात आली यावेळी आम्ही सर्वजण लोकशाही जागृत करण्याच्या दृष्टीने आपल्या देशाप्रती प्रतिज्ञा करतो कि आम्ही मुक्त, निष्पक्षपणे व शांततेने आगामी १७ वी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये , मतदान करण्यासाठी वंश, जात, समुदाय, भाषा व इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता, आम्ही निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेत आहोत.पश्चिम सांगवी जेष्ठ नागरिक संघ सांगवी येथील सभासदांनी मासिक मीटिंगमध्ये सामुदायिक शपथ घेतली. सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड यांनी त्यांना शपथ दिली.शपथ जोगदंड देतांना म्हणाले कि “ना जातीवर ,ना धर्मावर मतदान करा उमेदवारांच्या कर्तुत्वावर, घ्या मातृभूमीची आण करा, मतदान सर्वश्रेष्ठ काम .आपलं मत देशाच्या विकासाला. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदानाची किंमत नाही, घेणार मतदान मात्र करणार. आपल्या मत लोकशाही बळकटीला मत असे म्हणत सर्व जेष्ट नागरिकांना व उपस्थित सर्व सभासदांना शपथ जोगदंड यांनी दिली. मतदान करणे का गरजेचे आहे यावेळी सर्वानी 100% मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला . यावेळी सघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी सांगितले कि आपण सर्वांनी लोकशाहीच्या उत्साहात सहभागी झाले पाहिजे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन केले तर पिंपरी चिंचवड जेष्ट नागरिक महासंघाचे सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी यांनी सांगितले कि, आम्ही सर्वजण ज्येष्ठ नागरिक आहोत त्यामुळे सकाळी सकाळी उठल्यावर लवकर मतदान करावे नाही तर ऊन कमी झाल्यावर मतदान करा पण माझ्या एका मताने काय फरक पडणार ? असे म्हणू नका ,संविधानाने दिलेल्या अधिकाराचे आपण सर्वांनी पालन करून लोकशाही आधिक बळकट केली पाहिजे असे मत ईश्वरा चौधरी व्यक्त केले . या प्रसंगी सांगवी पश्चिम जेष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष, प्रकाश देशमुख ,पिंपरी चिंचवड जेष्ट नागरिक महासंघाचे सरचिटणीस ईश्वरलाल चौधरी,सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड, अशोक चव्हाण, राजाराम रोकडे,अर्जुन फासगे, शिवाजी लोखंडे,सौ.चंद्रभागा कर्डिले,सौ शैला लक्का,श्रीमती मंगला चौधरी,श्रीमती शैलजा बांगर,श्री रमेश राणे ,चंद्रप्रभा पवार ,छाया माने सह स्त्री पुरुष सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .पश्चिम सांगवी जेष्ट नागरिक संघाच्या सभासद व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करुन त्यांना मतदानाची शपथ देण्यात आली.




