पहिला राज्यस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात संपन्न; पुणे विभाग चॅम्पियनआंतरभारती बालग्राम, लोणावळा येथील बालकांची उल्लेखनीय कामगिरी







मावळ मराठा न्युज – लोणावळा,महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिला राज्यस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव 2025-26 अत्यंत उत्साहात पार पडला. तीन दिवस रंगलेल्या या महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा सोमवारी दिमाखात संपन्न झाला.या महोत्सवात पुणे विभागाने 24 सुवर्णपदकांची कमाई करत प्रथम क्रमांक पटकावला आणि मानाची चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर केली. पुणे जिल्ह्यातील विविध संस्थांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदविला.यामध्ये इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी संचालित आंतरभारती बालग्राम, लोणावळा येथील मुली मोठा गट आणि मुले लहान गट यांनी उल्लेखनीय सहभाग घेत उत्कृष्ट यश संपादन केले.आंतरभारती बालग्रामची उल्लेखनीय कामगिरीकबड्डी – मुली मोठा गट : प्रथम क्रमांककबड्डी – मुले छोटा गट : प्रथम क्रमांकरिले – मुली मोठा गट : प्रथम क्रमांकरिले – मुले छोटा गट : प्रथम क्रमांकखो-खो – मुली मोठा गट : द्वितीय क्रमांकखो-खो – मुले छोटा गट : द्वितीय क्रमांकया उत्कृष्ट यशामुळे आंतरभारती बालग्रामच्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवले उपस्थित होते. तसेच विभागीय उपायुक्त संजय माने (पुणे विभाग) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय खोमणे यांच्या हस्ते पुणे जिल्ह्याला चॅम्पियनशिप ट्रॉफी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.संस्थेच्या Executive Director मेधा ओक आणि HR Head संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांनी हे यश संपादन केले. स्पर्धेत यश मिळवून परतलेल्या बालकांचे इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी संचालित आंतरभारती बालग्रामच्या सर्व स्टाफने जल्लोषात स्वागत केले.यावेळी स्पोर्ट्स कोच शफीक यांचेही संस्थेने विशेष आभार मानले. तसेच संस्थेच्या प्रभारी अधिकारी दिव्या देशमुख यांनी मुलांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



