भरत अगरवाल नागरी सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न






लोणावळा दि ३ येथील प्रतिथयश भरत अगरवाल नागरी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ,२सप्टेंबर रोजी सभासद व हितचिंतकांच्या मोठ्या गर्दीत हॉटेल चंद्रलोक येथे संपन्न झाली. सुरुवातीस माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार, पत संस्थेचे माजी उपाध्यक्ष स्वे.अरविंद कुलकर्णी ,माजी उपाध्यक्ष स्वे.शरद बेंद्रे, तसेच गेल्या आर्थिक वर्षात दिवंगत झालेले, राजकीय ,सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, सैनिक, पोलिस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दीप प्रज्वलनाने सभेस सुरुवात झाली. गेली गेली २५ वर्षे पतसंस्थेला सतत अ वर्ग प्राप्त होत असून त्यामुळे ठेवींमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. सभासदांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष श्रीमती लता अगरवाल यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर पतसंस्थेचा ऑडिट रिपोर्ट ठरावाद्वारे एकमताने मंजूर करण्यात आला. सभेचे औचित्य साधून, शहरातील राष्ट्रीय व राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कवयित्री सिंधू जाधव यांना सन्मानित करण्यात आले. यावर्षीपासून पतसंस्थेच्या वतीने उत्कृष्ट कर्मचारी सेवा पुरस्कार सुरू करण्यात आला असून, यावर्षीचा हा पुरस्कार संस्थेतील लिपिक राणी परदेशी यांना प्रदान करण्यात आला. संस्थेतील सभासदांच्या दहावी आणि बारावीतील तसेच पदवीमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या पाल्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. पतसंस्थेच्या वतीने १५ टक्के लाभांश यावेळी सभासदांना जाहीर करण्यात आला. २०२५ ,२६ या या वर्षात पतसंस्थेला १,०१ २५, ३१८.३८ निव्वळ नफा झाल्याचे अध्यक्षा अगरवाल यांनी सांगितले. पतसंस्थेच्या एकूण ६७ कोटी रुपयांच्या ठेवी असून ४८ कोटी रुपये कर्ज वाटप झाले आहे. विविध बँकांमध्ये एकूण २८ कोटी ७७ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. संस्थेची सतत प्रगती होत असून ठेवींमध्ये वाढ होत आहे. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षा लता अगरवाल यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजू दळवी, संचालक बाळासाहेब पायगुडे , सुरेश गायकवाड , मिलिंद खळदकर, रामविलास खंडेलवाल, अनिल गायकवाड अशोक अगरवाल, , ॲड संजय गायकवाड, ऋषिकेश लेंडघर दिनेश ओसवाल, मिलिंद वाणी , सुनंदा दाभणे, व्यवस्थापिका वासंती खिरे, तसेच समिती सदस्य हर्षल होगले, लहू गायकवाड किशोर भोईर संतोष परदेशी सुरेश ढोकळे रमेश बोंद्रे योगिता जाधव हरिभाऊ दळवी अमित गंधे सुरेश जाधव उपस्थित होते.



