लोणावळा-खंडाळा लायन्स क्लबचा आरोग्यदायी उपक्रम; २०० विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी








मावळ मराठा न्युज -लोणावळा-खंडाळा येथील लायन्स क्लबच्या वतीने कुनेगाव येथील डेला फाउंडेशन स्कूलमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सखोल तपासणी करून आवश्यक त्या विद्यार्थ्यांना औषधांचे वाटप करण्यात आले तसेच आरोग्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.या शिबिरात डिस्ट्रिक्ट कॅबिनेट मेडिकल ऑफिसर लायन डॉ. पोपट ओसवाल, लायन डॉ. दिलीप सुराणा, लायन डॉ. लीना पौन, डॉ. कृतुजा तांदळे (गोजे) तसेच डॉ. प्रणाली ओसवाल यांनी मोलाचे योगदान दिले.क्लबच्या अध्यक्षा लायन कांता ओसवाल यांनी भविष्यातही अशा वैद्यकीय मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा किशोर धोबळे यांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.



