वृंदावन येथील राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत ‘नादब्रह्म नृत्यालया’च्या विद्यार्थ्यांची देदीप्यमान कामगिरी

मावळ मराठा न्युज -लोणावळा,वृंदावन येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘श्री नृत्यांजली ब्रजरास श्रीकृष्ण कला सांस्कृतिक महोत्सवा’च्या सहाव्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत लोणावळ्यातील प्रतिष्ठित ‘नादब्रह्म नृत्यालया’च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध गटांत प्रथम क्रमांकासह अनेक पारितोषिके मिळवून नृत्यालयाचा तसेच लोणावळ्याचा नावलौकिक वाढविला.नृत्यालयाच्या संस्थापिका व मार्गदर्शिका गुरू ज्योती उज्ज्वल भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांना रसिक आणि परीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.- ज्युनियर गट (शास्त्रीय समूह नृत्य): प्रथम क्रमांक- सब-ज्युनियर गट (उपशास्त्रीय एकल नृत्य): – लेशा चव्हाण – प्रथम क्रमांक – पर्णिका सिंघासने – प्रथम क्रमांक – ध्रुवी टेलर ( कल्याणजी )– प्रथम क्रमांक- ज्युनियर गट (उपशास्त्रीय एकल नृत्य): – जान्हवी गवाडे – तृतीय क्रमांक- ज्युनियर गट (शास्त्रीय युगल नृत्य): – सौम्या असावले व समीक्षा सालियन – प्रथम क्रमांक- सिनियर गट (उपशास्त्रीय एकल नृत्य): – तनिषा शिंदे – प्रथम क्रमांक – सुनिक्षा शेट्टी – द्वितीय क्रमांक- सिनियर गट (सांस्कृतिक महोत्सव समूह नृत्य): – वैष्णवी गुप्ता, दीक्षिता गुप्ता, तन्वी शिंदे, सहारा वाघमारे व पूर्वा शिंदे – उत्कृष्ट सन्मान- सिनियर गट (उपशास्त्रीय विशेष सादरीकरण): – गुरू ज्योती भोळे, हेमांगी भोळे, तन्वी शिंदे, वैष्णवी गुप्ता, सहारा वाघमारे व पूर्वा शिंदेभावपूर्ण अभिव्यक्ती, तालबद्धता, उत्कृष्ट अंगविक्षेप आणि प्रभावी अभिनय यांच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध करणाऱ्या विशेष सादरीकरणासाठी या समूहाला ‘सन्माननीय अतिथी पुरस्कार’ (Honorable Guest Award) प्रदान करून गौरविण्यात आले.या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि गुरू ज्योती भोळे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या यशामुळे ‘नादब्रह्म नृत्यालया’च्या सातत्यपूर्ण गुणवत्तेची आणि नृत्यक्षेत्रातील समर्पित कार्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page