न्यू सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने 27 नोव्हेंबरला लोणावळ्यात भव्य आरोग्य,नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर

मावळ मराठा न्युज -लोणावळा, न्यू सह्याद्री फाऊंडेशन यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर स्वातंत्र्यवीर सावरकर शाळा क्रमांक १, तुंगार्ली, लोणावळा येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, मोफत डोळ्यांची तपासणी, अल्प दरात चांगल्या दर्जाचे चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मोतीबिंदू असलेल्या गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.रक्तदात्यांसाठी विशेष भेट रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ५ लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण (विमा कंपनीच्या पात्रता निकष व अटींनुसार) देण्यात येणार असून, प्रत्येक रक्तदात्यास पाण्याची एक बाटली भेट म्हणून देण्यात येणार आहे.या शिबिरासाठी आधार ब्लड सेंटर, धनकवडी, पुणे; घुबड ऑप्टिकल आणि नेत्र चिकित्सालय, तळेगाव दाभाडे, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, तुंगार्ली तसेच संजीवनी हॉस्पिटल, लोणावळा यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.समाजातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, गरजू रुग्णांना मदत मिळावी आणि रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचविण्यास हातभार लागावा, या सामाजिक उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी लोणावळा व परिसरातील नागरिक, सामाजिक संस्था, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिबिराचा लाभ घ्यावा व रक्तदानासारख्या श्रेष्ठ कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.आयोजक :श्री. संदीप लक्ष्मण पोटफोडेसंस्थापक अध्यक्ष,न्यू सह्याद्री फाऊंडेशन.(नो. क्र. महा /२१४२/२०२६ पुणे )संपर्क : ८५८५८२८३८० / ७२४९१२२१९४

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page