लोणावळा नगरपरिषदेत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे पंडित दिन दयाल उपाध्याय यांना पुष्प हार अर्पण करताना

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा नगरीचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना नमन केले. यावेळी लोणावळा नगरपरिषद कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म: २५ सप्टेंबर १९१६ रोजी राजस्थानमधील धनकिया येथे झाला होता.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे प्रचारक आणि भारतीय जनसंघाचे म्हणजेच सध्याचा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव व सहसंस्थापक. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह त्यांनी जनसंघाच्या उभारणीत महत्त्वाचे काम केले होते. त्यांनी मांडलेले एकात्म मानववाद हे राजकारण आणि अर्थकारणातील एक मानवकेंद्रित तत्त्वज्ञान आहे, जे समाज व व्यक्तीच्या सर्वांगीण विकासावर भर देते.वळ समाजातील सर्वात शेवटच्या आणि गरीब घटकापर्यंत विकास पोहोचवणे, म्हणजेच ‘अंत्योदय’ हा त्यांच्या विचारांचा मूळ मंत्र होता.२५ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी भारतात ‘अंत्योदय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page