“बालचमूंचा उत्स्फूर्त सहभाग; सक्षम Gen Zची नांदी!”-डॉ प्रियंका पटवर्धन कलापिनीत मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न







मावळ मराठा न्युज – तळेगाव दाभाडे दि.“मनाचे श्लोक स्पर्धेत इतके बालचमू सहभागी होत असतील तर उद्याचीGen Z किती सक्षम असेल यात शंकाच नाही” ..असे मनोगत प्रमुख पाहुण्या डॉ .प्रियंका पटवर्धन यांनी कलापिनी, साने गुरुजी कथामाला,शाखा तळेगाव दाभाडे व समर्थ सेवा मंडळ यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात व्यक्त केले.कलापिनी सांस्कृतिक केंद्रात स्पर्धा संपन्न झाली. गेल्या ३२ वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. मावळ विभागातील जवळपास २५० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.यावेळी स्पर्धा संयोजक आणि कलापिनीचे उपाध्यक्ष अशोक बकरे, कलापिनीचे विश्वस्त डॉ .अनंत परांजपे, कुसुमाकर दामले, समर्थ सेवा मंडळाचे आशिष पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रियंका पुढे म्हणाल्या, “पालकांनी मुलांना निर्णय घेऊ द्यावे. आपण मुलांना मार्गदर्शन करावे. मनाच्या श्लोकातून मनाला चांगली शिस्त कशी लावावी? हे मुलांनी शिकावे.”कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी सर्व बालकांना आणि पालकांना आपल्या मनोगता मधून प्रोत्साहन दिले. स्पर्धेचे परीक्षण मृदुला कुलकर्णी आणि शालिनी झगडे यांनी केले. प्रास्ताविक कलापिनीचे उपाध्यक्ष अशोक बकरे यांनी केले. मोरेश्वर होनप यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. मोरेश्वर होनप, विनया मायदेव आणि सुभाष नाईक यांनी स्पर्धेसाठी अर्थसहाय्य केले. नंदिनी काळे यांनी सूत्रसंचालन केले. मनाचे श्लोक स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे (प्रथम, द्वितीय आणि तुतीय या क्रमाने)बालवाडी१)अद्वैत नाम जोशी (कलापिनी बाल भवन)२)श्रीयांश केंजळे (सरस्वती विद्यामंदिर) ३)अखंड भेगडे (आदर्श विद्या मंदिर) १ली,२ री – १)क्षिप्रा जोशी (बालविकास विद्यालय.)२)आयांश सोनपावले (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल.)३)आरोही शेटे (जिल्हा परिषद शाळा, नवलाख उंबरे)३री, ४थी – १)प्रत्युषा नवले (पैसा फंड प्राथमिक शाळा)२)मिताली पळे (सरस्वती विद्यामंदिर)३)प्रत्यूष जोशी (ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल )५ वी ते ७ वी.१)ऊर्वी गायकवाड (जैन इंग्लिश स्कूल.)२)शशांक महाले (आदर्श विद्या मंदिर.)३)आरोही टेमगिर ( ब्लेमिंग इंटरनॅशनल स्कूल ) ८वी ते १० वी..१)निमिषा चव्हाण (स्वामी विवेकानंद शाळा.)२)स्वरा माळी (सरस्वती विद्या मंदिर.)३)श्रावणी मोरे (बालविकास विद्यालय)खुला गटहर्षदा शिंदे अंकुर शुक्ल



