महायुतीचे श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील प्रभाग निहाय मतदार संवाद दौरा

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय ( A) रासप , मनसे,एसआरपी घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील प्रभाग निहाय मतदार संवाद दौरा रविवार दिनांक ५ मे रोजी लोणावळा शहरातील जयचंद चौक, जुनाबाजार, मावळा पुतळा,गावठाण,रोहिदासवाडा, सिद्धार्थनगर,अण्णाभाऊ साठे वसाहत या विभागात संपन्न झाला.महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ कार्य अहवालाचे वाटप शुभारंभ जयचंद चौक येथे करण्यात आला. जयचंद चौक,जुना बाजार,गावठाण, मावळा पुतळा,रोहिदासवाडा, सिद्धार्थ नगर, अण्णाभाऊ साठे वसाहत,छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजी मार्केट, नवा बाजार आदी ठिकाणी घरोघरी लोणावळा शहरातील महायुतीचे पदाधिकारी यांनी कार्यअहवाल व पत्रकाचे वाटप केले.यावेळी प्रभाग प्रचारात महायुतीचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page