डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाचा हेरीटेज वॉक उपक्रम

मावळ मराठा न्यूज,(शिवाजी घोडे)आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर व इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲंड कल्चरल हेरिटेज (इंटॅक) पुणे विभाग यांच्या तर्फे नुकताच”चिंचवड हेरिटेज वॉक” हा उपक्रम राबविण्यात आला. हेरीटेज वॉक अंतर्गत विद्यार्थ्यांनी चाफेकर वाडा,भैरवनाथ मंदिर, मंगलमूर्ती वाडा, मोरया गोसावी मंदिर व जिजाऊ पर्यटक उद्यान आदी ठिकानांना भेटी दिल्या.आर्किटेक्चर प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी नुकताच आपला बारावीचा अभ्यासक्रम संपवून आर्किटेक्चर याक्रिएटिव्ह अभ्यासक्रमामध्ये प्रवेश केला. हा नवीन अभ्यासक्रम सोपा कसा होईल, या विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्येआवड कशी निर्माण करता येईल, निसर्गातून आपल्या ऐतिहासिक वास्तूंमधून कशी प्रेरणा घेता येईल, याचाप्राध्यापकांनी केलेला हा वेगळा प्रयोग होता. आर्किटेक्चरची प्राथमिक ओळख करून देताना प्रथम वर्षाच्याइंडक्शन प्रोग्रॅम २०२२ मध्ये हेरीटेज वॉक हा उपक्रम सामील करण्यात आला.हेरीटेज वॉक उपक्रम विद्यार्थ्यांच्या अनुभवाची एक महत्वाची यशाची पायरी ठरेल असे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.धनंजय चौधरी यांनी सांगितले. अध्ययन आणि अध्यापना साठी एक महत्वाचे नाविन्यपूर्ण साधन म्हणून हेरीटेज वॉकचाअभ्यासक्रमामध्ये समावेश केला असे उप प्राचार्या आर्किटेक्ट छाया तिरवीर यांनी सांगितले. आर्किटेक्ट चिन्मय सुदामे, आर्किटेक्ट प्रचितीधार्मिक, आर्किटेक्ट पूर्णिमा चितळे, आर्किटेक्ट केतकी मोहळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील एकूण १००विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या उपक्रमांबाबत शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page