माझी वसुंधरा अभियान ४ .० अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेला राज्यस्तरीय पुरस्कार!साडेचार कोटीचे पारितोषिके






मावळ मराठा न्युज मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये आयोजित ‘माझी माझी वसुंधरा अभियान ४ .० अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेला राज्यस्तरीय पुरस्कार!साडेचार कोटीचे पारितोषिके अभियान ४ .० ’ सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. लोणावळा नगरपरिषदेस एकूण ₹ ४ .५० कोटीची ३ पारितोषिके माझी वसुंधरा अभियान ०४ मधे राज्यात पाचवा क्रमांक,भूमि घटक राज्यात पहिला क्रमांक माझी वसुंधरा अभियान ०५ मधे राज्यात तिसरा क्रमांक लोणावळा नगरपरिषदेने उत्कृष्ट कामगिरी करत राज्याच्या नकाशावर आपला ठसा उमटवला आहे. पशुसंवर्धन मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते हा बहुमान स्वीकारताना मनाला अत्यंत समाधान आणि अभिमान वाटला.पर्यावरणाची पंचतत्त्वे भूमी, जल, वायु, अग्नी आणि आकाश यांच्या संरक्षणासाठी आपण केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित आहे. हा पुरस्कार केवळ लोणावळा नगरपरिषदेचा नसून, आपल्या शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक घटकाचा आहे.पर्यावरण संरक्षण ही केवळ स्पर्धा नसून आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज मिळालेला हा सन्मान आपल्याला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. भविष्यातही आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित, हिरवेगार आणि समृद्ध लोणावळा घडवूया!या सन्मान सोहळ्यास राज्याचे मा.राज्यपाल आचार्य देवव्रत, विधानसभा अध्यक्ष मा.राहुल नार्वेकर, तसेच लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्रजी सोनवणे ,आरोग्य समिती सभापती धनंजयजी काळोखे ,पाणीपुरवठा समिती सभापती जीवनजी गायकवाड ,मुख्याधिकारी अशोक साबळे ,शहर अभियंता पंढरीनाथ साठे ,शहर समन्वयक शिवतेज भोंग ,उद्यान विभाग प्रमुख जितेंद्र राऊत ,स्वच्छता निरीक्षक ऐश्वर्या काटकर ,तुकाराम मोरमारे आदी मान्यवर उपस्थित होते.



