पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय देहूरोड येथे विज्ञान प्रदर्शन,रांगोळी,चित्रकला स्पर्धेचे उद्घघाटन

मावळ मराठा न्यूज़- देहुरोड, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय देहूरोड येथे विज्ञान प्रदर्शन,रांगोळी,चित्रकला स्पर्धेचे उद्घघाटन प्रसिद्ध लेखक वक्ते ज्येष्ठ ला. डॉ. शाळीग्राम भंडारी यांच्या हस्ते संपन्न झाला. दीप प्रज्वलन आणि औपचारिक उद्घाटनानंतर मुख्याध्यापिका रंजना सपकाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्यात. महा मृत्युंजय मंत्राने प्रमुख पाहुणे डॉ.शाळीग्राम भंडारीनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रत्येक व्यक्तिमत्व जन्मतःच एखाद्या रिकाम्या ग्लासासारख असत. जे जे आपण ग्लासात भरत जातो त्या त्या प्रमाणे ग्लासाची किंमत वाढत जाते. अगदी तशीच आणि तशीच परिपक्व व्यक्तिमत्त्वाची निर्मिती होते. परंतु या निर्मितीसाठी उत्तम संस्कार,समर्पण, सुसंगत साधना या सद्गुणांचा समावेश अत्यंत आवश्यक असतो हे डॉक्टरांनी स्वतःच्या अनुभवातून आणि विविध काव्यपंक्तीतून स्पष्ट केले. याबरोबरच आहार, विहार आणि विचार हे शारीरिक आणि मानसिक आरोग्य संपन्नतेसाठी किती महत्त्वपूर्ण आहेत हेही डॉक्टरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. एक पट खाणे, दोन पट पाणी पिणे,तीन पट चालणे, चार पट हसणे आणि पाचपट आनंदी राहणे हा पंचसूत्री कार्यक्रम प्रत्येकाने आत्मसात करणे आवश्यक आहे. कारण हाच निरोगी दीर्घायुष्याचा पाया आहे असं मत भंडारी यांनी मांडले. गझलकार प्रदीप निफाडकरांची अत्यंत संवेदनशील मुलीची कविता सादर करून मद्यपी पित्याची व्यसनमुक्ती करण्यास ती मुलगी कशी यशस्वी झाली हा प्रसंग आपल्या भिज शब्दातून डॉ.भंडारी मांडला. समारंभाचे विशेष अतिथी राधेश्याम भंडारी नी डॉक्टरांच्या पुस्तकांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना देऊन शाळेला एक संपूर्ण पुस्तकांचा सेट भेट दिला. त्याबरोबरच अतिशय अर्थपूर्ण शेरोशायरी सादर करून राधेश्याम भंडारांनी विद्यार्थ्यांची मन जिंकली.उगले मॅडम यांनी उत्तम सूत्रसंचालन आणि अतिशय समर्पक शब्दात वक्त्यांची ओळख करून दिली. मुख्याध्यापिका,रंजना सपकाळे उपमुख्याध्यापिका,सविता नाणेकर,पर्यवेक्षिका,विभावरी अभंग,सूत्रसंचालन उगले मॅडम यांनी तर कार्यक्रमाचे नियोजन कलाशिक्षक मिलिंद शेलार यांनी केले, यात गांगुर्डे व्ही.एस. परदेशी वाय.एल. घोडे के.एम. मराडे डी.के. सौ.काळे एस. डी. सौ.नालंदे सी.एम.प्रमुख कलाशिक्षक श्री मिलिंद शेलार आणि ज्ञानेश्वर मराठे यांनी विशेष परिश्रम घेतले. उप मुख्याध्यापिका सौ सविता नाणेकर यांनी संपूर्ण समारंभाच विवेचन करून उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानलेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page