मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने उद्योजकाच्या चालकांना वर्तन परिवर्तनाचे प्रशिक्षण

मावळ मराठा न्युज नेटवर्क-  १७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठा चेंबरच्या पिंपरी चिंचवड विभागातील कार्यालयात एका विशेष चालक प्रशिक्षणाचे आयोजन करून विविध उद्योगातील उद्योजकाच्या वैयक्तिक चालकांना एकत्रित करून साधारणतः शंभर पेक्षा जास्त चालकांना वर्तन परिवर्तनाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रमाचे प्रशिक्षक ,मार्गदर्शक म्हणून सन्माननीय सूर्यकांत मुळे वाहतूक, शिक्षण तज्ञ यांनी प्रभावीपणे मार्गदर्शन केले या मार्गदर्शनाचे देशातील सर्वच चालकांना या प्रशिक्षणाची नितांत गरज आहे असे मुळे म्हणाले या कार्यक्रमाचे आयोजन मा श्रीराम जोशी यांनी केले,कार्यक्रमात प्रास्ताविकात बोलताना जोशी  म्हणाले की अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन करून यापुढे आम्ही या परिसरातील सर्वच चालकांना प्रशिक्षण देण्याचे उपक्रम हाती घेणार आहोत कारण आता आम्हाला सूर्यकांत मुळे सारखे वाहतूक विषय व सुरक्षितता विषयासंबंधी मार्गदर्शक आम्हाला लाभलेले आहेत आणि याचा विशेष उपयोग करून घेण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहील,सर्व चालकांनी या कार्यक्रमाची माहिती आपल्या बांधवाला द्यावी आणि समाजामध्ये प्रामुख्याने चालकांमध्ये सुरक्षिततेसंबंधित भावना असावी या त्या कार्यक्रमाने उद्योग जगताचे आणि उद्योजकाचे सुरक्षा जपली जाईल याची खात्री वाटते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page