लोणावळ्यात त्रीभाषा धोरणचा जीआर महाराष्ट्र शासनाला रद्द करावा लागला त्याबद्दल आनंदत्सव साजरा







मावळ मराठा न्युज -लोणावळा,राज्य सरकारने जबरदस्तीने महाराष्ट्रातील शाळेमध्ये लादलेले त्रीभाषा धोरण हा “जी-आर” काल महाराष्ट्र चे मुख्यमंत्री यांनी रद्द केला.
खरंतर महाराष्ट्रातील शाळेत लादलेल्या त्रीभाषा धोरणाविरोधात ५ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे यांनी मोठ्या आंदोलनाची हाक दिली होती.मराठी माणसाच्या या एकजुटी मुळे तसेच दोन्ही पक्ष प्रमुखांच्या वाढत्या दबावामुळे सरकारला झुकत माप घ्याव लागले.त्या अनुषंगाने काल राज्य सरकारनी तातडीची पत्रकार परीषद घेऊन हा जि आर रद्द केला असे जाहीर केले. इथे मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय झाला.त्या अनुषंगाने आज महाविकास आघाडी लोणावळा शहर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर यांच्या वतीने मिठाई व फटाके वाजवून मोठ्या प्रमाणात जल्लोष उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थित कॉग्रेस आय महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.श्री.निखिल कविश्वर,शिवसेना पुणे जिल्हा संघटक मा.श्री.बाळासाहेब फाटक,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेशदादा गायकवाड,शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे,मा.नगराध्यक्ष राजूभाऊ गवळी,शिवसेना मावळ तालुका सल्लागार प्रमुख मारूतीभाऊ खोले,राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे लोणावळा शहर अध्यक्ष पप्पूभाई नासिर शेख,मनसे अध्यक्ष श्री. निखिल भोसले,शिवसेना लोणावळा शहरप्रमुख श्री.परेश बडेकर,मनसे प्रवक्ते अमित भोसले,मनसे उपाध्यक्ष दिनेश कालेकर राष्ट्रवादी कार्यध्यक्ष श्री. संतोष कचरे,रमेश दळवी,या सर्व मान्यवरांनी आपले या ठिकाणी मनोगतातुन आनंद व्यक्त केला व सर्व मराठी बाधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी उपस्थित शिवसेना शहर समन्वयक जयवंत दळवी, मावळ तालुका युवासेना उपधिकारी अक्षय साबळे,शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे,विभागप्रमुख कमर अन्सारी,उपविभागप्रमुख रोमल फरनांडिस,राम कोकरे,शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे,धिरज घारे,सुमित भोसले,सुनिल सोनवणे,संतोष,मनसे संघटक अभिजित फासगे,सुनील भोंडवे, प्रकाश पिंगळे, आकाश लोंढे, रामभाऊ कोकरे,जुबेर मुल्ला, श्रेयस कांबळे, शुभम पवार,कैवल्य जोशी, किशोर साठे, आकाश सावंत, संतोष येवले,सुभाष रेड्डी नरेश महामुनी विजय दांडेकर,आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने यावेळी उपस्थित होते.




