लायन्स इंटरनॅशनल क्लब डिस्ट्रिक्ट 3234 D 2 यांच्यावतीने जिल्हास्तरीय शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज -पिंपरी चिंचवड,दिनांक ६ सप्टेंबर रविवार रोजी पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क येथील सभागृहात लोणावळ्यातील मुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण बलकवडे व माजी शिक्षक व ज्योतिषाचार्य श्री. विठ्ठल बागदरे , मुख्याध्यापक आनंद गावडे यांचा जिल्हास्तरीय गौरव लायन्स क्लब इंटरनॅशनल क्लब डिस्ट्रिक्ट यांच्यावतीने करण्यात आला. शिक्षण व सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आणि प्रभावी कार्याने वेगळी ओळख निर्माण करणारे कर्तृत्ववान नेतृत्व व शिवदुर्ग मित्र, लोणावळाचे शिलेदार मुख्याध्यापक श्री.बाळकृष्ण बलकवडे,आनंद गावडे आणि सेवानिवृत्त शिक्षक व ज्योतिषाचार्य श्री. विठ्ठल बागदरे यांचा सदर कृतज्ञता सन्मान सोहळ्यात सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.या विशेष सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक व कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन श्रेयस दीक्षित आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाचे अध्यक्ष लायन मंगेश कदम व लायन्स सुप्रिमोच्या अध्यक्षा सौ.रंजना विश्वनाथ पुट्टोल यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील ५० कर्तुत्ववान शिक्षक,मुख्याध्यापक यांचा सन्मान करण्यात आला. यात लोणावळ्यातील बाळकृष्ण बलकवडे, आनंद गावडे व बागदरे यांचा जिल्हास्तरीय सन्मान होणे लोणावळेकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे लोणावळा परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page